कलावंतीण – प्रबळगड ट्रेक
दिनांक – 22 सप्टेंबर 2024
मुंबई, पनवेल जवळील ह्या दोन किल्ल्याना आम्ही 12 जणांनी मिळून भेट दिली. खर तर कलावंतीण नेहमीच सोशल मीडिया वर दिसणारा किल्ला, पण तो पाहण्याचा योग असा अचानक येईल असं वाटलं नव्हता. ह्या रविवारी आराम करायचा ठरला होतं, पण ग्रुप वर पोस्ट आली, आणी राहवला नाही.
ह्या ट्रेक साठी आम्ही 11 जण दोन गाड्यामधू पुण्यावरून, देहू रोड वरुन पहाटे 5.15 ला निघालो. 1 जण लेडीज गडाच्या पायथ्याशी थेट मुंबई वरुन आल्या. गडाच्या पायथ्याशी ठाकुरवाडी हे गावं आहे. जुन्या मुंबई पुणे हायवे ने गेल्यावर पनवेल जो टोल नका आहे, त्याचा आधी wadha wise city navacha एक प्रकल्प आहे, त्या प्रकल्पा मधुन ठाकुरवाडी पर्यंत जाण्याचा रस्ता आहे( त्यामुळे टोल देखील वाचतो).
पायथ्याला आम्ही 7.10 ला पोहचलो. सगळ्यांची भेट आणी आवरा आवर करून आम्ही निघालो.7.30 ला आमचा ट्रेक सुरु झाला. सुरुवातीला घाटातील वाट असते तशी वाट आहे अगदी काही ठिकाणी खडी, काही ठिकाणी दगडी वाट आहे. थोड चालून गेल्यावर प्रबळगड माची लागते. माचीवरून दोन वाटा फुटतात डावीकडची कलावंतीण ला जाते तर उजवीकडे प्रबळगड ची वाट आहे. माचीवर camping ची, जेवणाची सोय आहे. सुंदर वातावरणात भविष्यात कधी तरी camping पुन्हा एकदा हे सगळं अनुभूवायला मिळो ही अपेक्षा .
आम्ही माचीवर थोडी फोटोग्राफी करून पुढे कलावंतीण च्या दिशेने निघालो. चढाई अवघड नाही पण तशी सोपी नाही खिंडीत पर्यंत. कोकणातील दमट वातावरण आणी ढग आले असून देखील न पडणारा पाऊस, त्यामुळे आम्ही घामाघून झालो. पुन्हा खिंडीतून डाव्या बाजूला गेला की मात्र चढाई पूर्ण अंगावर आहे. दगडा मध्ये कोरलेल्या दीड ते दोन फूट उंचीच्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांचा टप्पा पार करून गेल की वर साधारण पंधरा फूट उंचीचा कातळ कडा आहे, जो पार करण्यासाठी स्थानिक लोकांनी रस्सी, दोरखंड बांधलेले आहेत सोबत तेही तिथे उभे असतात प्रत्येकी 30 रुपये दिले की आपल्याला वर, दोरी च्या मदतीने वर जा ये करता येते.वर पोहचण्यासाठी आम्हाला 2.15 तस लागले मात्र वर गेल्या नंतर च नजारा अप्रतिम . आम्ही महाराजांचे दर्शन घेऊन खाली उतरलो. खाली उतरण सोपं असलं तरी फार रिस्की आहे. खालचा खिंडीत आलो आणी मग प्रबळगडाकडे मार्गक्रमण केले.
कलावंतीण कडून प्रबळगडाकडे जायला खिंडीत तुन पण एक वाट जी, प्रबळगड च्या कातळाला लागून जाते. छोटी पायावट आहे. वापरातील आहे, मात्र पावसाळा नुकताच होऊन गेल्या मुळे पडझड झाली आहे. तसेच ह्या वाटेवर मधमाशंचा वावर खूप आहे. पायावतटेने गेलं की काही अंतरावर एक नाले मध्ये आपण पोहोचतो, तिथून डाव्याबाजूने वर गेलं की प्रबळ गड चढायला सुरुवात होते.साधारण 12.30 वाजले असावेत वर पोहचून आम्ही सोबत आणलेल जेवण फस्त केलं आणी थोडावेळ आराम केला.
आता आमची चढाई पूर्ण संपली होती, प्रबळगडचा घेरा खूप मोठा आहे, त्यामुळे वर देखील फिरायला निवांत वेळ हवा. आम्ही पहिले समोर कलावंतीण दिसतो त्या बाजूला म्हणजे दरवाजाचा डाव्या बाजूला गेलो. काही अंतर आम्ही गडाचा एका टोकाला पोहोचलो. तिथून दिसणार कलावंतीण देखण रूप अगदी कोणाची नजर लागू नये असच होतं. अगदी दिवाळी ला आपण जो किल्ला बनवायचो अगदी तसाच साचा.
तिथे ही थोडी फोटोग्राफी केली आणी दुसऱ्या टोका कडे कुच केली. जात असताना ठीक ठीकाणी माहिती फलक होतेच, वाटा अगदी मळलेल्या. पुढे तीन पडझड झालेले राजवाडे, पुढे एक गणपती मंदिर, पाण्याचे टाके हे सगळे पहात पहात आम्ही बोरीचा सोंडे पर्यंत पोहोचलो. तिथून इर्शाल गड दिसला आणी इर्शालवाडी वर कोसळलेल्या दुर्घटनेची आठवण झाली. पुन्हा आम्ही मागे फिरलो आणी डाव्या बाजूचा काळ्या बुरुजकडे जाऊ लागलो. तिथूनच जवळ असलेल्या काड्यावरून मोरबी धरण आणी इर्शालगड खूप जवळ आणी छान दिसत होते. हे सर्व पाहून आम्ही कार्वितून वाट काढतं परतीचा प्रवास सुरु केला. त्याच नाळेच्या वाटेने खाली आलो आणी प्रबळमाचीचा दिशेने जाऊ लागलो. नाळ चढावी पण उतरू नये हे पुनः एकदा जाणवलं. पण पर्याय नव्हता. खाली प्रबळमचीवर आलो पण कुठेही न थांबता पार्किंग पर्यंत थेट आलो. तब्बल 9 तास आम्ही 18.50 km चा ट्रेक केला होता. मान वर करून बघितलं तर आपण कुठून कुठे गेलो, कुठे पर्यंत आलो या वर विश्वास बसत नव्हता. ट्रेक अतिशय दमवणारा आणी शारीरिक शक्तीचा कसोटी पाहणारा होता, पण सर्वांबरोबर अगदी हसत खेळत पार पडला. इतक सुंदर वातावरण आणी निसर्ग पाहून मी पुन्हा येईन या निश्चयाने ट्रेक संपला