दिनांक – 16 सप्टेंबर 2024
बैलदरा – फेन्यादेवी घाटवाट
आम्ही आपल्या पुण्यातील STF या ग्रुप सोबत बैलदरा फेन्यादेवी ही घाटवाट केली. घाटवाटे ची सुरुवात ही सावळा ह्या गावापासून होते. सुरुवातीला काहीसा माळावरचा रस्ता आहे. वांद्रे भीमाशंकर ला जायला पण ह्याच माळावरून रस्ता आहे. पण काही अंतर गेले की वांद्रे खिंडीचा रस्ता आणी, बैलदरा ची वाट वेगळी होते आणी आपण बैलदरा घाटातून उतरणी ला लागतो. थोडा पुढे गेल्यावर कोथळीगड व कवल्याची धार दिसते, हा ट्रेक आम्ही मागील वर्षी नवरात्र मध्ये केला होता. लांबून ती कवल्याची धार अजून मनमोहक वाटतं होती.
सध्या पाऊस जरी कमी आला असला तरी त्या भागात अधून मधुन एखादी सर येऊन जात होती, काही काळ रिमझिम ही होती. भिज पाऊस असल्याने शेवाळ माजल होतं, थोडेफार घसरत घसरत आम्ही खाली आलो. सर्व पाण्या च्या घळी ओसंडून वाहत होत्या. आम्ही 11.30 च्या दरम्यान खाली पोहोचलो. खाली एक बारवं आहे. खूप छान दगडी बांधकामात केलेली व सुंदर रचना असलेली बारवं आहे.
बारवं साठी वाट सोडून उजव्या बाजूला जावं लागतं, आणी बारवं पाहून पुन्हा मागे याव लागतं. हाच ह्या ट्रेक चा मध्य बिंदू आहे. तिथून पुढे कळकराई गावा पर्यंत आपण जंगलातून चालत जातो आणी गावं संपल की फेन्यादेवी च नाळे मधुन वर चढायला सुरुवात करतो. फेन्यादेवी ची वाट अत्यंत मळालेली आहे. पूर्ण चढणी ची आहे. वाटेत छान धबधबे आहेत. धबधब्यात भिजून आम्ही मजा केली. आम्ही चार पाच जण पुढे असल्यामुळे आम्हाला खूप वेळ मिळाला पाण्यात भिजायला. पण पाण्याचा ठिकाणी दगड नीसरडे असल्याने मी व अजून एक जण बाकीच्यांना आधार देण्यास मदत केली, निम्मे लोक पास झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो. वाटेत काही गावकरी भेटले जे नेहमी राशन पाण्यासाठी खालच्या गावातून वरचा गावात जा ये करतात, बरेच जण अनवाणी चालत होते. तेही लहान मुलांना डोक्यावर, खांद्यावर घेऊन.नाळेच्या मध्ये उजव्या बाजूला फेन्यादेवीचं छोटा मंदिर आहे ( बांधिव नाही ). तिथून थोडा वर गेला की आपण पाथरवर शेत वाडी मध्ये पोहोचतो. पहिला गावं मेटखळ लागता तिथून साधारण 1 km सावळा गावं आहे. तिथेच आमची जेवणाची व्यवस्था होती. कपडे बदलून आम्ही कांदा भजी, पालक भजी, वरण भात, शिरा याचावर ताव मारला आणी परतीसाठी बस मध्ये जागा पकडली.
खरंच ट्रेक खूप छान झाला. अनेक ट्रेक केले पण या ट्रेक मध्ये STF ने केलेली व्यवस्था पाहून अव्वाक झालो. एखाद्या commercial ग्रुप ला पण लाजवेल अशीच सगळी सोय, नीट नेटके मानजमेंट आणी ट्रेक च्या प्रत्येक टप्प्यावर नवनविन माहिती, सूचना म्हणजे जबरदस्त.
ट्रेक लहान होतं, पण मनमुराद आनंद देणारा होता. लवकरच पुढील ट्रेक अशीच एक जावळी खोऱ्यातली घाटवाट