भुलेश्वर – ढवळगड – भुलेश्वर

स्वातंत्र्य दिन
15 ऑगस्ट 2024
भुलेश्वर – ढवळगड – भुलेश्वर
आम्ही 8 जणांनी स्वातंत्र्य दिन सुट्टी चे औचिक्य साधून भुलेश्वर ढवळगड भुलेश्वर ट्रेक केला.
या साठी सर्वांनी पहाटे पुण्यातून प्रवास सुरु केला, तरी आम्हाला भुलेश्वर ला पोहचून ट्रेक सुरु करायला 7.00 वाजले. पोहचल्या नंतर मंदिर नजरेस पडले आणी भारतीय शिल्पा कलेचा मनमोहक नजर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दर्शन घेऊन पुढे ट्रेक ला सुरुवात केली. पावसाळा असल्याने सुरुवातीला वातावरण थंडगार होते, पाऊस मात्र काही नव्हता. दौलत मंगल किल्ल्याचे पडझड झालेले बुरुज पाहून आम्ही पुढे निघालो. सुरुवातीचे अर्धा km. चे अंतर वनखात्या ने लावलेल्या झाडी मधुन आहे. तिथून पुढे पूर्ण माळरातून आहे. टेकवाडी गावाचा इंदलकर वस्ती ला लागून पुढे जावे लागते. पुढे गेल कि कुमुजाईमाते चे मंदिर लागते. मातेचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे गेला कि काही वयक्तिक घराण्याण्याची समाधी मंदिरं आहेत. तिथून उजव्या बाजूला जाऊन आम्ही दरी च्या बाजूला गेलो आणी समोर नजरेस डाव्या बाजूला पूर्ण पठार तर उजव्या बाजूने किंबहुना समोरच खाली वर खाली वर अशी घाल आणी मोठी चढणं. सकाळची वेळ होती त्यामुळे आम्ही समोरील चढ उतारचा मार्ग स्वीकारला, दरीत उतरल्यानंतर असंख्य पक्षांची सुंदर घरटी पाहायला मिळाली. बाकी पाऊस अत्यंत कमी असतो भागामध्ये त्यामुळे ओढे नाले सहज पार करता येत होते. एक ओढा पार केल्या नंतर थोडी विश्रांती घेऊन नाष्टा केला. पुढे रेल्वे लाईन पर्यंत चढ होताच. रेल्वे लाईन पार करून पुन्हा एक टेकडी चढलो समोर दिसणारा झेंडा ढवळ गड नसून वेगळंच काहीतरी आहे, आणी ऊन तापल्यामुळे त्याचा मागे ढवळगड स्पष्ट दिसत होता. ढवळगड ला आम्ही 10.30 ला पोहोचलो. मागच्या ट्रेक च्या थकवा जास्त झाल्यामुळे गड नीट बघता आला नाही. पण या वेळी तस झालं नाही. घरून आणलेलं जेवण मंदिरा शेजारील झाडा च्या सावलीत, जेवून घेतलं. काही वेळ घालवून आम्ही ढवळेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा भुलेश्वर च्या दिशेने निघालो.
गाड्या जेवणाने लोड झाल्यामुळे थोड्या स्लो झाल्या होत्या. त्यात ऊन डोक्यावर येऊ लागलं होतं. खाली उतरल्यानंतर काही हरण नजरेस पडली आणी आता आल्या मार्गी परत न जाता थोडी वाट बदलायची ठरवलं. समोर सर्व पठार दिसत असल्याने चुकण्याचा फार काही प्रश्न नव्हता. टार्गेट लांब होतं, पण नजरेच्या टप्यात होतं. येताना रेल्वे लाईन च्या उजव्या बाजूने आम्ही वर आलो होतो, ऊन वाढू लागल तस घाम वाढू लागला आणी आम्ही वाट बदलून रेल्वे लाईन ला लागून असेलेल्या डोंगराचा डाव्या बाजुने उतरलो. अंतर थोडे वाढणार होतं पण, पठार वरचा मार्ग तसा सोपा होता. अधून मधुन तीच हरणं बागडताना दिसत होती. मधेच बाभळी चं झाड दिसलं आणी, थोडा थांबल्या शिवाय राहावेना. वॉटर ब्रेक घेतला. झाड इतक लहान होतं कि आम्हाला 8 जणांना दोन वेगवेगळ्या झाड खाली लांब अंतरावर बसावं लागलं. मग पुढे सकाळी ज्या ठिकाणी थांबलो – कुमजाई माता मंदिर येथे पुढील थांबा केला.मार्गावर इंदलकर वस्ती सोडल्यास कोणतीही मानवी वस्ती किंवा ठिकाण नाही त्यामुळे पाण्याची उपलब्धता नाही. आता मात्र परीक्षा संपली अस वाटू लागलं कारण ऊन जाऊन सावली आली पण ती अल्प काळचं टिकली. निसर्गाने, आमची शेवटपर्यंत परीक्षा घेतली. पुढे हळू हळू आम्ही भुलेश्वर मंदिरा जवळ पोचहोलो. पाय अक्षरशः बुटामध्ये शिजले होते.
गाडी मधुन कपडे घेतले आणी कॉमन वॉशरूम change करायला जाणार तोवर पावसा ला सुरुवात झाली. अशा तर्हेने देवाने आम्हाला शाबासकी दिली.
अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आमचा ट्रेक पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये झाला, सकाळी लवकर गर्दी नसल्याने पटकन भुलेश्वराचे दर्शन झाले. दुसरा योगा योग म्हणजे आमचा ट्रेक च route फोटो मध्ये बघितला तर exact नाही पण साधारण शंकाराचा पिंडी च्या आकार सारखा आहे. साधारण 7.30 तासा मध्ये आमचा 22.50 km चा ट्रेक पार पडला. तेही अगदी कमी रु. 206 मध्ये.
अशातर्हेने आमची सिंहगड ते भुलेश्वर अशीच रांग पूर्ण झाली.
🙏🙏🙏जय भोलेशंकर 🙏🙏🙏
लेखन
साकेत मिठारी
पुणे

Leave a Reply