कात्रज बोगदा ते नारायणपूर ट्रेक

आज 11 ऑगस्ट 2024
कात्रज बोगदा ते नारायणपूर ट्रेक
आजच्या ट्रेक चे नियोजन थोडे वेगळं होतं, पण काही करणास्तव प्लॅन बदलवा लागला,रेंज ट्रेक तर करायचा होताच. मग कात्रज ते नारायणपूर करू असा निश्चित केलं.एकूण 6 जण ट्रेक साठी तयार झाले.
मग उठून 5.40 ला आम्ही जुना बोगदा जवळ पोहोचलो आणी पहाटे 5.45 ला ट्रेक सुरु केला.
आंबीलढाग पर्यंत ची वाट माहित होती मात्र तिथून पुढे शोधाशोध करावी लागणार हे पक्क माहित होतं. आंबीलढाग STF ( सह्याद्री ट्रेकिंग फौंडेशन ) चे जुने जाणते आणी मात्तबर मंडळी भेटली त्यांनी गराडे गावापर्यंत कसे जाता येईल ते सांगितलं.
मग काय काही stf च्या ग्रुप जो दिवेघाट कडे निघाला होता त्यांचा बरोबर चालल्यानंतर आमची वाट वेगळी झाली, आणी आम्ही 6 जण उजव्या बाजूला वळलो. थोडे अंतर गेल्या नंतर काळूबाई ( गॉगलवाडी चे ) मंदिर लागले. अतिशय सुंदर आणी भरपूर सोयीनियुक्त मंदिर तेही मालरानावर पहिल्यांदा पहिले, देवी चे दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुरु केला.
समोर नजरेस चतुरभूज मंदिर खुणावत होते, तीच नारायणपुरे कडे वाट देखील होती. पायावटेने भरपूर लहान लहान पाझरतलाव लागले. थोडेफार फोटो काढत काढत आम्ही चतुरभूज ला आम्ही पोहोचलो. श्रावनामध्ये दर्शन झालं ह्याचा एक वेगळ समाधान होतं. अतिशय सुंदर मंदिर वा आजूबाजूचा परिसर विकसित केलेला आहे. तिथे घरून आलेला नाष्टा करून आम्ही पुढचा प्रवास सुरु केलं. तिथून पुढे वाट गराडे पर्यंत बऱ्यापैकी उतरनीची आहे. सुरवातीला इथापेवस्ती लागली त्यानंतर मात्र रावडेवाडी, गराडे असा काँक्रिट / डांबरी रस्त्याने चालत आम्ही गराडे गावातील पंचमुखी मंदिरात पोहोचलो. एक वेगळ शिवलिंग पाहायला मिळालं.
आता वातावरण बदलायला सुरुवात झाली होती, गारवा कमी होऊन ऊन तापू लागलेलं. मग थोडा चहापाणी करून आम्ही कुमथाळ वस्ती मार्गे पुढे सोमूर्डी पर्यंत निघालो, शेतवड संपली संपूर्ण पायावट ही माळ रानातून आहे. सोमूर्डी गाठले आणी पुढील मार्गाची विचारणा केली परत पुढची वाटचाल सुरु. मधेच एक छोटा वाहता ओढा लागला आणी पाय भिजवून तो पार करण्याशिवाय पर्याय नव्हता. कुठलीही ठोस पायावट इथे नाही, ज्या नजरेस पडतात त्या सर्व गुरूंच्या वाटा आहेत त्यामुळे समोर दिसणाऱ्या सूर्यपर्वत चंद्रपर्वत च्या पायथ्याला जायचं आहे हे उद्देश ठेऊनच आम्ही चालू लागलो आणी पायथला (माळरानाच्या बाजूला ) थोडे वर गेल्या नंतर पोखर गाव दिसले आणी ट्रेक संपायला आला आहे, असे लक्षात आलं. पोखर ला पोहोचलो आणी जोरदार पाऊस सुरु झाला, त्यामुळे थोडा वेळ थांबान्या शिवाय पर्याय नव्हता. पाऊस संपल्यावर निघालो आणी 2.45 ला नारायणपूर ला दत्ताचा चरणी नतमस्तक झालो.
अशा रीतीने 26.50 कि. मी. ट्रेक साधारण 9 तासामध्ये पूर्ण झाला.
आजचा ट्रेक खऱ्या अर्थाने ऑफबीट होता, संदीप दादा कडून फाईल मिळाली होती पण ती गॉगलवाडी इथून सुरु होतं होती. त्या रूट मध्ये आणी आम्ही केलेला रूट खूप फरक होता. तरी दैवानेसाथ दिली आणी कुठेही वाट न चुकता, आम्ही सुखरूप नारायणपूर ला पोहोचलो. दत्ता महाराजांचे आशीर्वादाने लगेच गाडी मिळाली आणी परतीचा प्रवास सुरु झाला. सर्व ttmm असल्यामुळे रु 306/- ट्रेक संपन्न झाला.
लेखन
साकेत मिठारी

Leave a Reply