सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस

दिनांक 23 व 24 मार्च 2024
सिद्धघड-गायदरा- भट्टीचे रान – कोंडवळ – भीमाशंकर – गणेश घाट – पदरगड – खांडस
मी व ajit bhosale,⁨Indrajit Randhave Trekker⁩,sachin salunkhe, Pravin Pawde Ttmm Pune Team Trekker⁩ पाच जणांनी मिळून, हा ट्रेक करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी पहाटे 4.00 ला वारजे, पुणे निघालो. लोणावळा, खोपोली, कर्जत, म्हसा असा प्रवास करत आम्ही सिद्धघड चे पायथ्याशी असलेल्या बोरवडी या गावी पोहचलो. सकाळी 7.45 चे दरम्यान ट्रेक सुरु करून आम्ही सिद्धघड माची वर साधारण 9.15 ला पोहोचलो. माची ची वाट पण खडी आणी अंगावर आहे.
माची वर 7- 8 घरांची वस्ती आहे. माचीला सिद्धघडवाडी असेही म्हणतात, बहुतेक सर्व वयस्कर लोक आहेत, तिथेच एकाचा घरी नाश्ता केला. आम्हाला पुढे गयादऱ्या ला जायचे असल्याने सर्व बॅग तिथेच ठेऊन आम्ही सिद्धगड बालेकिल्ल्या कडे निघालो. बालेकिल्ला ची वाट पण बिकट आणी रिस्की आहेत, चार पाच ठिकाणी रॉक पॅच आहेत. वरती गेल्या गेल्या महादेवाची पिंड, जुन्या वाड्याचे अवशेष पहायला मिळतात.एका बाजूला बुरुज आहेत व त्याचा विरुध्द दिशेला मोठा झेंडा आहे, जो खालून नजरेस पडतो. बालेकिल्ल्या वरून पूर्वी केलेला गोरखगड, मछिंद्र गड स्पष्ट दिसत होते, इतका मोठा वाटलेला गोरखघड आता मात्र सिदगडा वरुन लहान वाटत होता.
पूर्व नियोजित आमचा प्लॅन सिद्धघड – गायदरा – भट्टी चे रान- अहुपे – अहुपे घाट – खोपीवली मध्ये ट्रेक ची समाप्ती असा होता. मात्र बॉलेकिल्ला वरुन भीमाशंकर आणी पदरगड दिसायला लागल्यावर सगळं बदललं आणी रूट पण मग बदलला. खाली पुन्हा माची वर आलो आणी, स्थानिक लोकांना विचारून ऑनलाइन असलेल्या gpx रूट चा मदतीने, आम्ही दम दम्या डोंगर चा बाजूने चालायला सुरुवात केली दुपारचे 1.00 वाजले होते,तरी जंगल वाट असल्याने ऊन जाणवत न्हवते, काही अंतर गेल्या नंतर येतोबा डोंगर व दम दम्या यांचा मधून एक नाळ आहे, तोच भट्टीचाराना कडे जातो, वर पोहचलो कि एक खिंड आहे. डाव्या बाजूला दोन तस चालला तर अहुपे गाव आहे, तर उजव्या बाजूला भट्टीचे रान आहे. येथे पोहोच्याला आम्हा 4.30 वाजले होते.
थोडा विसावा,सोबत शिदोरी खाऊन आम्ही कोंडवळ च्या दिशेने निघालो. खिंड पार केल्या नंतर कोकण आणी देस यातील फरक लगेच वातावरण मध्ये जाणवू लागला, इथे देखील जंगल रूट आहे, सदर रस्ता हा नाभी ट्रेक रस्ता आहे, त्यामुळे कोंडवळ पर्यंत तोच चालत राहिलो, एकूण 22.71 कि. मी. चा ट्रेक झाला होता व रात्रीचे जेवण, मुक्काम याचे काही निश्चित नसल्यामुळे आम्ही सुरवातीला कोंडवळ ला राहण्याचा विचार केला, परंतु भीमाशंकर ला जास्त चांगली होऊ शकते, व भीमाशंकर महादेव चा दर्शन होऊ शकेल या विचारवर, कोंढावळ येथून गाडी करून भीमाशंकर गाठले.
भीमाशंकर येथे कामजामाता मंदिरा मध्ये राहण्याची सोय झाली. स्थानिक हॉटेल मध्ये जेवण करून रात्री 9.30 ला महादेवाचे दर्शन घेतले.
पहाटे 4.30 उठून, आंघोळ वागैरे आटपून 5.30 ला ट्रेक ला सुरुवात केली 6.45 पर्यंत अंधार व वाट उतरणी ची असल्यामुळे थोडा स्पीड सर्वांचा कमी होता.
साधारण सकाळी 8.00 ला पदरगड पायथ्याला पोहोचलो. पदरगड चढून आम्ही चिमणी क्ल्याम्बिंग पर्यंत पोहचलो. हा मात्र या किल्ल्यावरचा सर्वात अवघड व थ्रीलिंग असा पॅच आहे. पण आमचा अनुभवी सचिन साळुंखे यांनी सर्वांना बरोबर वर घेतल. तिथून पुढचा वरचा टप्पा अंतर कमी पण चढ्याला व उतरायला थोडा अवघड व exposure चा आहे. वरती छान टाके आहेत, सिद्धघड चा बाजूला एक गुहा आहे. व दूरवर अनेक किल्ले इथून पाहायला मिळतात. पुन्हा खाली येऊन आम्ही ज्या बाजूने चढलो, त्याचा विरुद्ध दिशेने उतारायला सुरुवात केली. उन्हाळा असल्याने संपूर्ण भूषभूशीत माती वाटे वरती होती, खाली पुन्हा हिरवागार जंगल होते, थोडा विसावा घेऊन, नाश्ता केला आणी आम्ही खांडास चा बाजूने निघालो.
घाट संपन्याचा अगोदर एक गणपती बाप्पा चे मंदिर लागते, कदाचित म्हणूनच याला गणेश घाट असे म्हणत असावेत, बाप्पा दर्शन पुन्हा आम्ही खांडास भीमाशंकर ट्रेक ला येऊ असे सांगून खांडास ला सकाळी 11.00 ला पोहचलो.
ट्रेक जरी संपला असला तरी आमची गाडी सिद्धघड चा पायथ्याशी पार्क केलेली होती, तिथपर्यंत जाण्याच आव्हान समोर होता.
मात्र देव दयेने एक खासगी गाडी लिफ्ट घेऊन आम्ही खंडास च्या बस स्टॉप पर्यंत पोहोचलो, पुढे भाड्याचा गाडीने म्हसा या गावा पर्यंत आणी तिथून एका रिक्षाने बोरवडी म्हणजेच सिद्धगड चा पायथ्याशी पोहचलॊ.
पुन्हा गेलेल्या वाटेनेच सायंकाळी 5.00 ला पुण्याला परत आलो
लेखन
साकेत मिठारी.
” श्वास सह्याद्री, ध्यास सह्याद्री “

Leave a Reply