गोरखघड – भिवगड ट्रेक

10 मार्च 2024
गोरखघड – भिवगड ट्रेक
मी , प्रभाकर पाटील @⁨Prabhakar Patil Trekker Sangamvadi⁩ व गिरीश दीक्षित @⁨Girish Dikshit Trekking Safar Sahyadri⁩ तिघांनी गोरखघड व भिवगड चा ट्रेक केला. या साठी सगमवाडी पुणे येथून पहाटे 5.00 ला प्रवासाला सुरुवात केली जुन्या पुणे मुंबई हायवे ने लोणावळा खोपोली कर्जत मार्गे आम्ही गोरखघड पायथ्याशी असलेल्या दहेरी या गावी सकाळी 7.45 ला पोहचलो , गोरक्षनाथाचे दर्शन घेऊन ट्रेक सुरु व्हायला 8.15 वाजले , दोन तासाचा चढाई नंतर आम्ही बाले किल्ल्यावरील गुहेत पोहोचलो , सोबत आणलेली न्याहारी खाऊन आराम केला. गुहेचाही वर एक महादेवचे मंदिर आहे , तोच ट्रेक चा summit पॉईंट आहे. किल्ल्याची चढाई अवघड नाही , परंतु बाले किल्ला थोडा रिस्कि आहे , बाले किल्ला चढण्या पेक्षा उतरण जरा जास्त risky वाटले , किल्यावर भरपूर पाण्याचा टाक्या आहेत , एक ठीकाणी धारकरी टाकी साफ करण्याचे काम करत होते. साधारण 12.00 वाजता आम्ही किल्ला उतारायला सुरुवात केली , सव्वा तास खाली येण्यास लागला.उतरताना बऱ्याच ठीकाणी पायघसरण्याची शक्यता आहे , ट्रेक ची endurance लेवल moderate आहे.
त्यानंतर आम्ही जेवणासाठी कर्जत च्या दिशेने निघालो. रस्त्यामध्ये कडाव चा श्री बाल दिगंबराचे दर्शन घेतले ,नंतर कर्जत येथे कापीलेश्वराचे दर्शन घेऊन जेवण केले.
पुन्हा भिवगड चा दिशेने 6 km परत मागे आलो , भिवगड खूप सोपा किल्ला आहे वर जाण्यास आम्हाला 25-26 मिनिटे लागले तर सर्व किल्ला explore करून खाली यायला 👍संपूर्ण सव्वा तास लागला.
आम्ही हा ट्रेक गौरकामात ह्या गावातून केला , तर अजून एक वाट उडप या गावातून देखील आहे , अशा रीतीने आमचे दोन्ही किल्ले पाहून झाले.
पाहिलेले दोन्ही किल्ले हे तेहळणी साठी वापरात होते , तसेच गोरखघड वर महाराज येऊन गेले आहेत असा उल्लेख त्या ठीकाणी असलेल्या बोर्ड वर करण्यात आला होता.
गोरखगाडा वरुन दिसणारे दृश्य एकदम नयन राम्य आहे. आता उन्हाळ्यात असे आहे तर पावसाळ्यात किती छान असेल याची कल्पना करवत नाही. समोर उभा ठाकलेला सिद्धगड , शेजारील धम धम्या डोंगर , अहुपे ची घाटवट डाव्या बाजूला मछिंद्र गड , दूरवर दिसणारा जिवधन, नाणे घाट ची रांग , नानाचा अंगठा , अशा बऱ्याच गोष्टी आमचा मित्र गिरीश दीक्षित मुळे आम्हाला पाहायला मिळाल्या. येताना मात्र सिद्धगड मनात पुढच्या ट्रेक लवकरच यायचा हि भावना करून गेला . लोणावळा येथे राजमाची पॉईंट वर संसेट सोबत चहा चा आस्वाद घेऊन आम्ही पुण्याकडे निघालो .
लेख
साकेत मिठारी

Leave a Reply