चोरवणे मार्गे नागेश्वर ट्रेक

रविवार दि. 11feb2024
या ट्रेक साठी आम्ही शनिवारी रात्री पुण्याहून निघालो एकूण 14 मेंबर असल्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर केली होती. रात्री साडेदहाला निघून पौड मुळशी ताम्हणी घाट मार्गे आम्ही चोरावणे येथे पहाटे साडेचारला पोहोचलो, चोरावने उतेकर येथे उतेकर मोरे यांच्या घरी आमचे चहा नाश्ता व फ्रेश होण्याचे नियोजन होते सहा वाजता उपीट नाश्ता करून आम्ही ट्रेकच्या दिशेने निघालो साडेसहाच्या दरम्यान आम्ही ट्रेक सुरु केला वाट तशी पूर्णपणे मळलेली आहे व काही ठिकाणी पायऱ्या आहेत सोबतच सुरक्षिते करता रेलिंग काही ठिकाणी लोखंडी पायऱ्या करण्यात आल्या आहेत, सव्वा दोन तासांमध्ये म्हणजेच पावणे नऊ वाजता नागेश्वर गुहेत पोहचलो, ट्रेक सोपा आहे पण अंतर जास्त असल्यामुळे व बऱ्याच ठिकाणी अवघड चढाई असल्याने तो सर्वांना अवघड व मोठा वाटतो.
तेथे आम्ही पिंडीला छान पैकी सजवून पूजा केली. त्यानंतर सर्वांनी सोबत आणलेली शिदोरी खाऊन, खाली उतरण्यास सुरुवात केली. साडेअकरा ला आम्ही पार्किंग मध्ये पोहोचलो, उतेकर मोरे यांचे घरीच जाऊन फ्रेश जेवन केले व पुण्याचा दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. रात्री 10.30 ला सुखरूप घरी पोहचलो.
लेख
साकेत मिठारी

Leave a Reply