माहूली गड, भांडार दुर्ग, पळसगड ट्रेक

शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024
आम्ही पाच जणांनी हा ट्रेक केला
मी साकेत मिठारी, नरेश कुबेर काका, उदय देशपांडे काका, करण जगताप व बळीराम अडसुळे.
आम्ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माहुली गड, भांडारदुर्ग व पळसगड चा ट्रेक केला, श्री गर्भसंस्कारक्षेत्र माहुलीगड या नावाने तो परिचित आहे. शिवाजी महाराज गर्भामध्ये असताना बाराच काळ येथे होत्या अशी आम्हाला स्थानिकांनी माहिती दिली. त्यामुळेच गर्भसंस्कार क्षेत्र म्हणतात.
या ट्रेक साठी आम्ही पुण्याहून जाणार असल्याने 4.5- 5 तासाचा प्रवास होता. पहाटे लवकर निघून गेलो असतो, तरी ट्रेक सुरु व्हायला 9.00 वाजले असते, तसेच तीन किल्ले करून पुन्हा पुण्याला येणे शक्य होईल असे न वाटल्याने, आम्ही आदल्या😍 दिवशी सायंकाळी 6.00 ला पुण्यातून निघुन रात्री 12.00 श्री. अगीवले रघुनाथ यांचे घरी मुक्कामासाठी पोहचलो.
पहाटे लवकर नाश्ता वागैरे आवरून 6.45 ला ट्रेक सुरु केला, वाटेत वन विभागाची चौकी मध्ये तीस प्रत्येकी शुल्क भरून चढाई सुरु केली, संपूर्ण ट्रेक चढाईचा आहे, सर्वात शेवटी माहुली गडावर जाणेसाठी एक शिडी आहे. वरती बऱ्यापैकी संपूर्ण पठार आहे, मुख्य दरवाजा, त्या शेजारील गुहा बघितल्या नंतर आम्ही कल्याण दरवाजा चा दिशेने निघालो वाटेत बरेच वस्तू चे अवशेष आहेत, माहुली मातेचे मंदिर आहे थोडे पुढे गेल्यावर एक खिंड आहे, खिंड उतारायला सोपी आहे पण चढायला अवघड आहे, तिथे एकावर एक अशा दोन शिड्यांची सोय करण्यात आली आहे, शिडी पार केल्यानंतर आपण भंडारदुर्ग वर प्रवेश करतो, भंडारदुर्ग वर कल्याण दरवाजा, पाण्याचे टाके इतकेच पाहायला मिळाले , सकाळी लवकर ट्रेक चालू केल्या मुळे भंडारदुर्ग वर आमचा व्यतारिक्त कोणीही न्हवते. समोर दिसणारा वजीर सुळका मात्र नवीन एका ट्रेक ची चाहूल देत होता. येथील एका सुळक्यावरून भटुड्या सुळका व चंदेरी दिसत होता.
भंडारदुर्ग बघून आम्ही पुन्हा माहुली गडाचा बाजूला आलो कारण आम्हाला आता पळसगड करायचा होता.
माहुली गडाचा उजव्या बाजूला पळसगड आहे तर भंडारदुर्ग डाव्या बाजूला आहे. पळसगड चा दिशेला जाताना एका ठिकाणी दोन वाटा फुटतात एक वाट माहुलीगडाचा गणेश दरवाजा कडे जाते तर दुसरी वाट पळसगड चा दिशेने जाते. गणेश दरवाजा पाहून आम्ही पळसगड कडे निघालो, पळसगड वरुन निसर्ग सुंदर दिसतो मात्र एक तुटलेले जाते, दगडात कोरलेल्या पादुका इतकंच पाहायला मिळाले. किल्यावर फारसा वावर नसल्यामुळे वाटा पण क्लिअर नाहीत, तसेच जिकडे तिकडे फक्त वाळलेले हत्तीगवत, कार्वी व बाकी जंगली वनस्पती आहेत.
अशा रीतीने पळसगड पाहून आम्ही पुन्हा माहुली गडावर आलो व खाली उतरण्यास सुरुवात केली
सकाळी 6.45 ला सुरु केलेला ट्रेक सायंकाळी 4.30 ला संपला, ज्यांचा घरीच मुक्काम केला होता त्या ठीकाणी जेवण करून आम्ही सायंकाळी परतीचा प्रवास सुरु केला, रात्री 11.30 घरीच सुखरूप पोहोचलो.
लेख
साकेत मिठारी

Leave a Reply