Madhumakrand gad trek

Madhumakrand gad trek
रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी मी, हरीश कुलकर्णी व समीर सागवेकर हातलोट दरवाजा मार्गे मधु मकरंदगड व येताना मोहन दाभे घाटवाट केली.
यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून गाडीतून निघालो. महाबळेश्वर जवळील भोसे येथून गाईडला घेऊन आम्ही सकाळी सात वाजता हातलोटला पोहचलो , तिथून आम्ही ट्रेकची सुरुवात केली वाट तशी मळलेली आहे, व जागोजागी मार्किंग केलेले आहे. घाट वाटेणे जातानाची वाट तशी अंगावरती आहे, पण संपूर्ण जंगलातून असल्यामुळे वारा किंवा उन्हाचा धगा जाणवत नाहीत.
मकरंद गडावर सप्त शिवालयातिल एक मंदिर आहे व एक पाण्याचे टाके आहे, मधु गडाची वाट तशी मळलेली नाही, पण गाईड असल्यामुळे आम्हाला ती सापडली. परंतु वाट थोडी अवघड असल्यामुळे आम्ही फक्त पायथ्यापर्यंत जाऊन आलो.
गडाच्या पायथ्याशी घोणसपुर हे जंगम बहुल गाव आहे, गावातच राहणाऱ्या आमच्या गाईडच्या घरी न्याहारी करून आम्ही पुढील ट्रेक चालू केला, घोणसपूर ते दाबे मोहन वाट पूर्ण उतरण्याची आहे, साधारण दीड वाजता आमचा ट्रेक संपला.
पण ठरल्याप्रमाणे एक व्यक्ती गाडी घेऊन आम्हाला हातलोट पर्यंत सोडणार होती, ऐन वेळेला ती न आल्यामुळे पुन्हा आम्हाला पुन्हा डांबरी रस्त्याने पायपिट सुरू करावी लागली . आठ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आमच्यातील एकाला नेण्यास टू व्हीलर ची सोय झाली, त्यानंतर साधारण साडेचारला आम्ही आमच्या फोर व्हीलर ने पुण्याकडे प्रस्थान केलेकेले
अशा तर्हेने ट्रेक सुंदर पार पडला व रात्रीचे भोजन करून आम्ही दहा वाजता घरी पोहोचलो
साकेत मिठारी
वारजे,पुणे.

Leave a Reply