आज रविवार दिनांक 22 ऑक्टोबर 2023
रोजी आम्ही कोकणातील बिरा डॅम ( उन्नेनी धरण) ते अंधार बंद असा ट्रेक केला. त्यासाठी आम्ही पहाटे चार वाजता पुण्यातून निघण्याची नियोजन केले होते सदस्य संख्या 83 इतकी असल्यामुळे निघायला थोडा उशीर झाला, साधारण सकाळी पावणे आठच्या दरम्यान आम्ही बिरा डॅम येथून ट्रेकला सुरुवात केली पाऊस अजिबात नसल्यामुळे व हवामानातील आद्रतेमुळे ट्रेकमध्ये एकदम दमछाक झाली सुरुवातीचा चार किलोमीटरचा टप्पा पूर्णपणे चढ आहे, हिरडी गावात पोचल्यानंतर मात्र विचारासाठी मध्यंतरी ठिकाण आहे आहे, ( त्या ठिकाणी जेवणाची सोय आहे) गावाशेजारीच एक पुरातन महादेवाचे मंदिर आहे व त्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा एक उत्तम स्त्रोत आहे, तिथून मात्र फार काही चढ नाही व सर्व रस्ता जंगलातून आहे जंगलातील पडलेली झाड, दरी म्हणजे निळा प्रकाराच्या वनस्पती फुलं व फुललेली कारवी पहात पहात आम्ही, दुपारी दोन पर्यंत अंधार बन येथे पोहोचलो, मध्ये छोटे ओढे आहेत, त्याच ठिकाणी आम्ही घरून नेलेले जेवण संपवून पुढे चालायला सुरूवात केली, साधारण 15 ते 16 किलोमीटरचे अंतर आहे पण वाट जंगलातून असल्याने लवकर सरत नाही, साधारणपणे सर्व ट्रेकर्स हा ट्रेक अंधारबन ते बिरा ( decend) असा करतात ज्यामध्ये उतरण्याचा भाग जास्त आहे, आम्ही तो उलटा केल्यामुळे मला चढण (ascend) जास्त लागली, बाकी ट्रेक फार छान आहे, ट्रिक संपल्यानंतर अंघोळ, मध्ये नाष्टा करून, आम्ही सायंकाळी सव्वा सात पर्यंत घरी पोहोचलो.
आजच्या ट्रेकचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे सदस्य संख्या 83 इतकी असली तरी सर्वांनी आनंदाने ट्रेक पूर्ण केला, अविनाश बांदल Avinash Bandal यांचे उत्तम नियोजन हो महेश कारले Mahesh S Karle यांची त्यांना असलेली साथ, त्यामुळे ट्रेक निर्विघ्न, कोणतीही अडचण अथवा वाद न होता अगदी व्यवस्थित पार पडला,
गणपती बाप्पा मोरया,
मंगलमूर्ती मोरया,
आणि पुढच्या ट्रेकला नक्की या!
या जयघोषात व सुंदर आठवणींचा ट्रेक पूर्ण झाला.