दिनांक १६/११/२०२३, गुरूवारी Rahul Khedkar , naresh kuber kaka व prashant jagtap, Saket Mithari या चौघांनी सुंदर असा रांगडा ट्रेक पूर्ण केला.. भटकंतीचं प्लॅनिंग आदल्या दिवशी एका तासात झाले . ताबडतोब कुबेर काका व करण दुपारी चार च्या बसणे कोल्हापूरला निघाले व मी रात्री सात वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी सांगली सोडले… कोल्हापूरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता कोल्हापूर सोडले..किल्ला गाठण्यासाठी कोल्हापूरहून गारगोटी पाटगाव मार्गे १०० किमी अंतर पार करून भटवाडी हे गाव गाठावे लागते….. भटवाडी पासून चिक्केवाडी मार्गे जाणारी मार्ग वाट ही जवळ दोन तासाच्या अंतरानंतर तुम्हाला रांगण्याजवळ घेऊन जाते.. या किल्ल्यास येणारा दुसरा मार्ग म्हणजे आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारूर गावातून आल्यास दोन अडीच तासाचा चढ चढून आपण किल्ल्याच्या बुरुजाखाली येतो… किल्ल्याच्या आसपास व मध्य मध्यभागी बऱ्यापैकी जंगल असून या जंगलात गवा रानडुक्कर अस्वल या प्राण्यांचा वावर असल्याने दुर्ग भ्रमंती सावधपणे करावी लागते संपूर्ण किल्ल्यापाहण्यस बराच वेळ लागतो मनसोक्त पाहायला2 दिवस लागतात..किल्ल्यावरून सोनगड मनोहर मनसंतोष गड व कोकणातील काही प्रदेश नजरेस पडतो…. हा किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधला असून यासोबत जवळपास 14 किल्ले बांधण्याचे श्रेय या राजाला जाते.. 1781 सालच्या एका पत्रात रांगण्याचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात ” येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत भारत देशावर उतरेल”…
किल्ल्यावर पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असून यशवंत दरवाजा .हनुमंत दरवाजा ..गणेश दरवाजा ..हनुमानाचे मंदिर रांगणा देवीचे मंदिर ,दगडी दीपमाळ.. निंबाळकर वाडा आणि आतली छोटी विहीर.. भव्य असा पाण्याचा तलाव… काही समाध्या .. तलावाच्या बाजूला असलेले भग्न शिवमंदिर किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदी.. हत्तीसुंड माची ..चोर दरवाजा… शिवकालीन तोफा.. आवर्जून पाहण्यासारख्या गोष्टी आहेत..
गडावरील महादेव मंदिराच्या शेजारी आम्ही आमच्या जेवणाचा ब्रेक घेतला..
सकाळी 8.15 वाजता सुरू केलेला हा ट्रेक आम्ही ४.१५ ला संपविला.. जवळपास 25 किलोमीटर तंगडी तोड पायपिट करून यानंतर आम्ही भुदरगड करायचे ठरवले.. भुदरगड हा जवळपास रांगणा किल्ल्यापासून एक तासाच्या अंतरावर असून गाडी ही पूर्ण गडावर पर्यंत जाते.. हा किल्ला कोल्हापूर पासून साधारणपणे 55 किलोमीटर अंतरावर येतो हा किल्ला येथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे .
भुदरगड किल्ला हा सुद्धा राजा भोज दुसरा याने बांधला आहे
गडावरील पाहण्यासाठी ठिकाणे भैरवनाथाचे हेमाडपंथी मंदिर महादेव मंदिर मंदिराच्या आवारात दीपमाळा समोर बुरुजावर लावलेला ध्वजस्तंभ होतो देवळामागून जाताना जांभ्या दगडातील वाडा या वाड्यात महाराजांनी जीर्णोद्वार केलेले पुरातन शिव मंदिर आहे.. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे वर अस्तित्वात असलेला दूधसागर तलाव… तलावा शेजारी बघणावस्थेत असलेले भवानी मंदिर व काही समाध्या… या किल्ल्याच्या तटबंदी वरून आम्ही शांतपणे बसून होणारा सूर्यास्त अनुभवला.. शेवटी आम्ही 6.15 ला कोल्हापूरला रिटर्न निघालो… कोल्हापूरला पोचल्यावर आम्ही तांबडा पांढरा रस्सा चा आस्वाद घेऊन आम्ही आमचा ट्रेक संपविला…
Write up by
Rahul khedkar