भैरवगड – मोरोशी

रविवार दिनांक 17नोव्हेंबर 2024

भैरवगड – मोरोशी चा

हा ट्रेक बऱ्याच ट्रेक्कर्स च्या बकेट लिस्ट मध्ये असतो , तसच माझाही मनात होतं कदाचित अचानक शनिवारी काही जणांशी संपर्क झाला आणी योग आज जुळून आला.

ह्या ट्रेक साठी आम्ही पुण्याहून चौघे @~Amol Chaudhari @Jalinder Kamathe – Ttmm Yevalewadi @DIPAk Patil TTMM Trekker Wanawadi शनिवारी रात्री 8.00 ला निघालो.
बाकी मंडळी @roshan nainani TTMM Trekker Mumbai यांचा नेतृत्वात मुंबई वरुन येणार होती.

संपूर्ण पुणं पालथ घालून आम्हाला भोसरी मार्गे नारायणगाव,जुन्नर, मोरोशी असा पोहचायला रात्री 12.30 वाजले. तिथे एक हॉटेल च्या पडवी मध्ये आराम करून आम्ही पहाटे 5.15 ला ट्रेक ला सुरुवात केली.
सुरवातीला थोडाफार चढ नंतर सपाटी , पुन्हा चढ पुन्हा सपाटी अस करत आम्ही माची पर्यंत पोहोचलो, आम्ही या ट्रेक साठी technical सपोर्ट म्हणून घाटी ट्रेक्कर्स, मुंबई यांची मदत घेतली होती. त्यामुळे माची च्या अलीकडे एका ठिकाणी सर्व शस्त्रयांची पूजा करून पुढे भैरव माची गाठली. सकाळी आम्ही साधारण 7.00 ला भैरव माची पुढचा टप्पा चढण्यासाठी तयार होतो. पुढील टप्पा technical सपोर्ट अजिबात कोणीही चढू नये असाच आहे. रविवार आणी फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी वरचा प्रसिद्ध किल्ला म्हणून सर्व होउषे नवशे तिथे आले होते. साधारण 250 पेक्षा जास्त लोकं तिथे होते त्यात आम्ही ज्या ग्रुप बरोबर technical support घेऊन जाणार होतो त्यांचा नंबर सर्वात शेवट होता. त्यामुळे आम्हाला वर पोहचायला 10.30 वाजले. कताळतल्या पायऱ्यांनी वर जाताना गर्दी होती त्यामुळे काही जाणवत नव्हत. पण चुकून खाली नजर गेली की काही लोकं जे घाबरून आरडा ओरडा का करतात ते कळलं. वरती जर technical support असेल तरच जावा अन्यथा जाऊ नये. वर चढण्या आधी आम्हाला सर्वांनाच परिचित असलेले कमळू मामा पोकला – सर्वात फेमस गाईड भेटले. वर जाताना थांबव लागतं होतं पण गुहेत ला टप्पा पार केल्या नंतर पूर्ण ट्रॅफिक जाम. आम्हाला ही पुढे जाऊ देत नव्हते की वरचे कोणी खाली येत होते.
आम्ही त्या गर्दी तुन कसबसं वर 10.30 वर पोहोचलो. वरती गेल्या नंतर सपाट टापू आहे. भैरवगड हा टेहळणी बुरुज आहे. पण किल्ला करणारा खरंच अवलिया. एकदम कोरलेल्या पायऱ्या आणी अगदी इंजिनीरिंग marvel म्हणावा अस काम. वरुन दिसणारा नजारा विलोभनीय आहे. तिथून हरिश्चंद्रगड, नाणेघाट, माळशेज घाट आणी बरेच किल्ले, सुळके आपला लक्ष वेधून घेतात. सर्व काही बघून सोबत नेलेला आम्ही किरकोळ खाऊ खाल्ला आणी आम्ही खाली येण्यास निघालो. पहिल्या पायरी जवळ आलो आणी आम्हाला सांगण्यात आला की अजून गर्दी आहे, अजून बरेच लोकं अजून वर देखील आले नाहीत तसेच खाली जायला गर्दी आहे. दोन तास किमान लागतील. मग आम्ही कोरडं पडलेल्या पाण्याचा टाक्या इथे निवांत सावलीला आराम केला. थोडा वेळ झोप लागली तोवर काही हौशी नवशी मुल मुली आले आणी त्यांचा गप्पा मुले झोप मोडली, पण बसून राहण्याशिवाय पर्याय पण नव्हता. तरी 11.30 ते 2.00 वेळ काढला आणी खाली यायला निघालो. हळू हळू खाली आम्ही सरकत जाणू तुळशीबागेतली गणपती ची गर्दी आठवली.आमच्या rappelling पॉईंट पर्यंत पोहोचायला आम्हाला 3.00 वाजले. rappelling करत आम्ही खाली माचीवर आलो. तिथून पुढे आम्ही लगेच खालचा प्रवास सुरु केला. 4.10 आमच्या गाडीजवळ, मोरोशी च्या मार्गांवरील हॉटेल जवळ पोहोचलो. तिथून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेत एक तलावात आंघोळ केली अन पुढे निघालो.
आज पर्यंत बरेच ट्रेक केले, कमी अंतर असून देखील इतका वेळखाऊ कोणताच ट्रेक नव्हता. बाकी ट्रेक छान झाला. बराच वेळ पायऱ्या वर बसून काढल्यामुळे थोडी उंचीची भीती कमी झाली.

एक मात्र शिकलो अशा फेमस आणी गर्दी असलेल्या ट्रेक ला वेळ मिळालं तर सोमवार ते शुक्रवार च्या मध्ये जायचं, शनिवार रविवार अशा ठिकाणी जाणे नाही.

✍लेखन
साकेत मिठारी, पुणे

Leave a Reply