ह्या सुट्टीच्या ३ दिवस काहीतरी जबरी प्लॅन करणार म्हणून बसलो होतो, पण काही करता आले नाही. घरातच कुजलो, म्हणून मग ठरवलं – आता बाहेर पडायलाच हवं!देवाने ऐकलं म्हणावं आणि संध्याकाळी उशिरा हरीश ह्यांचा ग्रुपवर मेसेज आला, “सिंहगड अर्ध परिक्रमा करू आणि राजगड पायथ्याशी असलेल्या विंझर गावात उतरू.” वर “मी, साकेत आणि कवटीकर सर नक्की चाललो […]
तारीख: ५ डिसेंबर २०२४ बाईक राईड: पुणे – वीर धरण बॅकवॉटर्स – नाईक निम्बाळकर वाडा – संतोषगड किल्ला – वर्धंगड किल्ला – श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर – सज्जनगड किल्ला – पुणे एकुण किलोमीटर: ३६०+ किमी रविवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी, मी पुण्याहून सुरुवात करून साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक खुणा शोधण्यासाठी ३६०+ किमी चा अविस्मरणीय […]
सिद्धगड ट्रेक संपूर्ण .. सिद्धगड – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील कठीण श्रेणीत असलेला किल्ला . वर्षाचे शेवट एका वेगळ्या आणि अत्यंत थरारक राज मार्गाने सिद्धगड ट्रेक पूर्ण केला किंबहुना प्रदक्षिणाच केली.. ठरल्याप्रमाणे मी,दीपक पाटील,रुपेश कुलकर्णी, पियुष कुलकर्णी,पराग मेटकर असे रविवारी सकाळी 4.30 वाजता चिंचवड हून निघालो . जवळपास 8 वाजता गडाच्या पायथ्याशी असलेल्या बोरवाडी […]
दिनांक १० डिसेंबर २०२४. सिंहगड ते रायगड संस्मरणीय पदभ्रमण सहल करून आलो होतो. अतिशय वेगळी अशी अनुभूती होती. कोणाशीही काही बोलावे असेही वाटत नव्हते. मोक्ष यालाच म्हणत असावेत 🙂 . मोहिमेची मुहूर्तमेढ १४ जानेवारी रोजीच रोवली गेली होती, पण तेव्हा मी त्यात सहभागी नव्हतो. ऑगस्ट मध्ये रामदरा-मल्हारगड दरम्यान प्रद्युम्नमुळे आमची भेट झाली पुढे साधारण सप्टेंबर […]
ढाक बहिरी ..हा महाराष्ट्रातील कठीण ट्रेक आहे .हा ट्रेक ज्यांना उंची फोबिया आहे आणि नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी नाही.ढाक बहिरी हे महाराष्ट्र राज्य रायगड जिल्ह्यात आहे. या ट्रेकची सुरुवात आम्ही जांभवली, कामशेत येथून केली. 1 महिन्यापासून या ट्रेकचे नियोजन केल्यानंतर..शेवटी या ट्रेकसाठी 5 सदस्य निश्चित झाले.मी,दीपक पाटील,विवेक,रुपेश कुलकर्णी आणि राहुल यांनी 24 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी […]
कितीतरी दिवस मी या घाटवाटाचे नियोजन करत होतो. अनेक वेळा लोक लहान गटात हा ट्रेक प्लॅन करतात. काही मित्र आधी ट्रेक पूर्ण करून प्रकाशित करतात. लोक वचनबद्धता शेवटच्या क्षणी रद्द केल्यामुळे ही वेळ 50:50 चान्स होती. पण तो एक आवाज मला स्पर्शून गेला “रोशन सर मैं छोड़ दो लागू किया है”. मला कॉर्पोरेट कंपनी माहित […]
रविवार दिनांक 17नोव्हेंबर 2024 भैरवगड – मोरोशी चा हा ट्रेक बऱ्याच ट्रेक्कर्स च्या बकेट लिस्ट मध्ये असतो , तसच माझाही मनात होतं कदाचित अचानक शनिवारी काही जणांशी संपर्क झाला आणी योग आज जुळून आला. ह्या ट्रेक साठी आम्ही पुण्याहून चौघे @~Amol Chaudhari @Jalinder Kamathe – Ttmm Yevalewadi @DIPAk Patil TTMM Trekker Wanawadi शनिवारी रात्री 8.00 […]
वासोटा किल्ला: एक अद्वितीय ठिकाण तिबाजु पाणी आणि एका बाजूला भक्कम डोंगरावर वसलेला वासोटा किल्ला म्हणजे निसर्गाची एक अप्रतिम देणगी. या किल्ल्याला वशिष्ठ गुरुंच्या शिष्याचा निवास असल्यामुळे वशिष्ठ असे नाव मिळाले, पण कालांतराने शब्दभ्रंषामुळे हे वासोटा म्हणून ओळखले जाऊ लागले. हा किल्ला शिलाहार कालीन राजांनी, विशेषतः दुसऱ्या भोज यांनी बांधले असल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी […]
सहजच एक योजना आखली, आणि विश्रांतवाडी, पुण्याहून मुळशीमार्गे, ताम्हिणी घाटातून, पिंपरी फाट्याच्या दिशेने कुंडलिका नदीला ओलांडत बारपे, भांबर्डे करत शेवटी एकोले गावात पोहोचलो. आमचा आजचा माणूस म्हणजे घनगड किल्ला, ज्याचं आधीपासूनच बऱ्यापैकी अभ्यास केला होता. एकोले गावात पोहोचल्यावर अतुल च्या सल्ल्यानुसार नवनाथ दादांची भेट घेतली. त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन मिळालं, गप्पांच्या सोबतीने चहा झाला, आणि तिथूनच […]
किल्ले रायरेश्वर रोहिडा कमळगड आणि केंजळगड करण्याचा मी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत होतो. बरेचदा असे झाले की मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे योजना रद्द केली. कधी कधी कार्यक्रमात सहभागी व्हायला कोणी तयार नव्हते. जरी हा लांबचा प्रवास होता आणि एकट्यामध्ये रूपांतरित करणे धोकादायक, वेळ घेणारे आणि महाग असेल. त्यामुळे यावेळी अंतिम योजना पूर्ण झाली. महाराजांनी […]