मोहनगड, कावळागड, मंगळगड, दौलतगड यावेळी दोन दिवसांत ४ किल्ले पाहून झाले. आम्ही एकूण ५ जण रविवारी पहाटेच पुण्यातून भोरच्या दिशेने निघालो आणि वरंधा घाटाच्या थोड अलीकडे असलेल्या मोहनगडाच्या जवळ पोचलो. मोहनगड: याला शिवकाळात जासलोडगड किंवा चासलोडगड असेही नाव होते. तसेच माथ्यावर असलेल्या दुर्गादेवीच्या मंदिरामुळे याला जननीदुर्ग असेही म्हणतात. तसेच पायथ्याशी असलेल्या दुर्गाडी या गावामुळे दुर्गाडीचा […]