चंदेरी

काळ्या कातळातला ‘चंदेरी’ ठाणे व रायगड जिल्ह्याच्या सीमेवर, माथेरान डोंगर रांगेत अनेक आकाशाला भिडणारे सुळके व किल्ले आहेत. यातल्या विकटगड, प्रबळगड व कलावंतीण, इर्शाळगड या किल्यांचे ट्रेक्स आधी केले आहेत. या सर्व किल्ल्यानवरून श्री मलंग गडावरून सुरु होणारी डोंगररांग आपले लक्ष वेधून घेते. या डोंगर रांगेत तवली, नवरा-नवरी-वऱ्हाडी, मलंगगड, म्हैसमाळ आणि चंदेरी ही गिरीशिखरे येतात. […]