दिनांक 21 जुलै 2024
कात्रज – बोपदेव – कानिफनाथ – दिवेघाट
यासाठी आम्ही पहाटे 5.30 ला कात्रज चौकात जमून, पुढे एकत्र रिक्षाने कात्रज जुना बोगदा गाठला आणी ट्रेक ला 6.00 ला सुरुवात केली. पावसाची रीप रीप चालू होती पण वातावरण एकदम स्वच्छ आणी सुंदर होते. आंबीलढग येथे वॉटर ब्रेक घेऊन आम्ही पुढे निघालो, पुढची वाट थोडीशी फसवी आहे, पण देवदयेने आम्ही बरोबर वाटेने गेलो. पुढे येवलेवाडी च्या वरील टेकडी वरील मारुतीचे दर्शन घेऊन थेट बोपदेव गाठले. सकाळी 9.00 ला आम्ही बोपदेव मंदिरात पोहोचलो, तिथेच न्याहारी केली आणी पुढचा प्रवास सुरु केला. तिथून पुढे आम्ही कानिफनाथ च्या दिशेने निघालो. सरळ सोपी असणारी वाट प्लॉटिंग मुळे, थोडी वेडी वाकडी झाली.गुरुपौर्णिमा असल्यामुळे कानिफनाथ मंदिरामध्ये गर्दी होती. दर्शन घेऊन दिवेघाट च्या दिशेने निघालो. इथून पुढे मात्र अजिबात पाऊस नव्हता. साधारण दुपारी 1.45 ला आम्ही पांडुरंगाच्या मूर्ती जवळ पोहचलो. माऊली दिसला आणी ट्रेक च थकवा नाहीसा झाला. पुढे सासवड मार्गे पुण्याला परतलो.
ट्रेक अतिशय छान आणी खेळीमेळीच्या वातावरणात झाला.
विठ्ठलाच्या मूर्ती कडे पहिला आणी ठरवलं की पुढील ट्रेक दिवेघाट ते भुलेश्वर लवकरचं करायचा, कारण या परिसरात आताच ट्रेक करण तस सोपं आहे, अजिबात थकवा जाणवत नाही आणी कुठलीही पाण्याची ओघळ, रॉक पॅच नाही.
लेखन – साकेत
दिनांक – 21 जुलै 2024