कैलासगड व घनगड ट्रेक

कैलासगड व घनगड ट्रेक
आज आम्ही ताम्हिणी – मुळशी भागातील कैलासगड व घनगड ट्रेक केला, सकाळी ४.३० ला आम्ही पुण्याहून निघून साधारण ७.३० ला सुरुवात केली, मारखिंड, गुंफा, गारजाई मंदिर, विरगळ, पहात पहात ८.३० ला वर पोहोचलो, पुन्हा घरून नेलेला नाष्टा करून,खाली पायथ्याशी ९.३० ला पोहोचलो. तिथून आमचा प्रवास कैलासगड च्या दिशेने सुरू झाला. सकाळी १०.४५ ला कैलासगड ची चढाई आम्ही सुरू केली व वर शिवमंदिरा मध्ये आम्ही ११.३० ला पोहोचलो. कैलासगड चा ट्रेक थोडा अवघड आहे व सर्व चढाई खडी असल्याने दमायला होते, पण वरून दिसणारे विहंगम दुष्य पहिल्यावर मन खुश होते, शिवमंदिरातिल महादेवाचे दर्शन घेऊन, आम्ही काही काळ ऊसंत घेऊन, जेवण करुन खाली पायथ्याशी जायला निघालो. ऊतरण पण थोड आवघड आहे, पण सर्व १२ जण नेहमीचे ट्रेकर असल्याने ३० मिनिटात सुखरूप खाली आलो , थोडा वेळ Hemant Kanchan सरांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रेचिंग करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
ट्रेकचे अत्यंत योग्य नियोजन व व्यवस्थापन श्री. Avinash Bandal यांनी केले, त्यासाठी त्यांचे खूप आभार🙏🙏🙏
सर्वांचे सहकार्य व वक्तशीरपणा मुळे, ट्रेक छान झाला

Leave a Reply