गरजाईवाडी ते सांडोशी – रायगड trek 

गरजाईवाडी ते सांडोशी, रायगड trek 
दिनांक 07 जुलै 2024
आम्ही 14 जणांनी मिळुन गरजाईवाडी ( पानशेत , घोळ च्या शेजारी ) ते सांडोशी वा त्यानंतर रायगड किल्ला असा ट्रेक केला . ह्यासाठी आम्ही गरजाईवाडी येथून सकाळी 7.30 ला चालायला सुरुवात केली , पूर्वी कोकणदिवा केला असल्यामुळे थोडी वाट माहितीची होती . कोकणदिवा खालील पठार पार केल्यानंतर मात्र आम्हाला gpx file चा आधार शिवाय पर्याय न्हवता. संपूर्ण वाट उतरनीची आहे वाटेत तीन ते चार ठिकाणी पाण्याचा नळ्या आहेत ज्या पार कराव्या लागतात,बाकी जंगल वाट आहे, मच्छर आणी किडे यांचा त्या ठिकाणी भयंकर वावर आहे , मधेच एका पाण्याचा प्रवाहा जवळ आम्ही न्ह्यारी केली आणी पुढे निघालो. नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिट उशिरा म्हणजे 11.15 ला सांडोशीला पोहोचलो . तिथे गेल्यावर आम्हाला एक स्थानिक पिक उप मिळाली त्यातून आम्ही प्रवास करून रायगड पायथ्याशी पोहोचलो.
साधारण 12.15 ला आम्ही रायगड चढायला सुरुवात केली आणी दुपारी 1.45 च्या दरम्यान महाराजांच्या समाधी जवळ पोहोचलो. प्रचंड पाऊस चालू होता त्यामुळे दम लागणे किंवा थोडी विश्रांती घेणे याची गरज वाटली नाही.जाताना अनेक धबधबे पाहायला मिळाले . ढग फुटी होते आहे की काय असा भास होतहोता परंतु तसं बोलायची कोणाची हिम्मत न्हवती. समाधी आणी जगदीश्वराच्या मंदिराचे दर्शन गर्दी असल्याने लांबूनच घेतले आणी परतीचा प्रवास चालू केला.पाऊस इतका वाढला की मुख्य दरवाजा मध्ये गुडघ्या एवढे पाणी होते तिथून खाली येताना एक मोठा धबधबा, जो जाताना सुंदर फेसळलेला दिसत होता त्याने रौद्र रूप धारण केलं होत , पाण्या बरोबर लहान मोठे दगड वरुन येत होते,आणी काही लोकांना लागत होते. शिव प्रतिष्ठान चे काही स्वयंनसेवक आणी काही धारकरी लोकांना तो घातकी टप्पा पार करण्यासाठी मदत करत होते. आम्ही तीन जण सुखरूप बाहेर पडलो, बाकी लोक मागे अडकले होते. धोका टळला अस वाटलं आणि हुश्श करून पुढे निघालो .पण खरा धोका पुढे होता , लहान नवीन नवीन धबधबे तयार होत होते आणी सुरवातीला ठिसूल माती आणी दगड आणी मग लहान खडे खाली येत होते , दगड रेलिंग ला लागला की टनटन आवाज येत होता,आणी lokancha आरडा ओरडा सुरु होत होता . त्यातून बचाव म्हणजे वाटेचा परवताची जी बाजू आहे त्या बाजूने जाणे , तरी देखील खडे रेलिंग ला धडकून येत होते पण , काही दगड लागले देखील , पण तरी सुखरूप आमचा ग्रुप मधील कोणालाही कोणतीही गंभीर दुखापत न होता आम्ही खाली पायथ्याशी पोहोचलो .
सुगरण असा कोकणी जेवण करून आम्ही ताम्हिणी मार्गे परतीचा प्रवास पुण्याचा दिशेने सुरु केला . खूप काही शिकायला मिळालं . हेल्मेटच महत्व कळलं . आणी जे रील्स बघून पावसाळी पर्यटनाला होउषे गौशे येतात त्यांनाही चांगला धडा मिळाला.

Leave a Reply