काल रविवारी मी, naresh kuber व rameshvar kawitkar सर यांनी सातारा जवळील, जरंडेश्वर ,पाटेश्वर ,मेरुलिंग व पालपेश्वर ट्रेक केला. आम्ही सर्वजण पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो, प्रथम जरंडेश्वर करून,नंतर आम्ही पाटेश्वर कडे निघालो, त्यानंतर मेरुलिंग व पालपेश्वर केला. जरंडेश्वर ला थोडा रस्ता चुकल्याने काही आमचा वेळ वाया गेला परंतु लालजी भगत ( राहणार जळगाव तालुका जावळी सातारा)या एका देवरूपी माणसाने मदत केल्यामुळे आम्ही आमच्या गाडीपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकलो. पाटेश्वरच्या महादेवाच्या पिंडी बघून आम्ही भारावून गेलो, तसेच मी मेरुलिंग वरील मनमोहक दृश्य बघून सर्व क्षण निघून गेला, वाटेत काकांनी आम्हाला एका शाकंभरी देवी च्या मंदिराचे दर्शन घडवले, तिथून आम्ही पालपेश्वर च्या सात गुहा बघण्यासाठी गेलो. गुहा छान आहेत पण बघणं अवस्थेत आहेत. अशा रीतीने सर्व ट्रेक पूर्ण करून आम्ही सायंकाळी सहा वाजता पुण्याच्या दिशेने परत निघालो. काकांच्या मार्गदर्शनाखाली आमचा ट्रेक खूप छान झाला