दिवेघाट – मल्हारगड – धवळगड ट्रेक

तंगडी तोड ट्रेक
रविवार, दिनांक 4 ऑगस्ट 2024
दिवेघाट – मल्हारगड – धवळगड ट्रेक
मागील कात्रज ते ट्रेक मध्ये ठरवल्या प्रमाणे या ट्रेक चेक आयोजन केले होते. सुरवातला आम्ही तिघेच ट्रेक ला जाणार होतो परंतु हळू हळू संख्या वाढून 22 वर गेली, टेम्पो ट्रॅव्हलर व एक खासगी गाडी असा प्रवास करत आम्ही दिवेघाट च्या माथ्यावर 6.30 ला पोहोचलो.
ज्ञानेश्वरमाऊली पालखी च्या विसावा येथे दर्शन घेऊन, पुढे पांडुरंगाचे चरणी माथा टेकवून घेऊन आम्ही 6.45 ला चालायला सुरुवात केली. प्लॉटिंग कंपाउंड मुळे, परत मागे येऊन झेंडेवाडी च्या दिशेने जाऊन आम्ही डोंगर माठ्या च्या बाजूला वळलो. डोंगरच्या माठ्या वरुन सरळ पायावत आहे. सुरुवातीला झेंडेवाडीचा दगडी तलाव लागतो. माथ्यावर गेल्यावर एका बाजूला पसरलेलं महाकाय पुणे शहर तर उजव्या बाजूला धुक्यात लपलेलं सासवड आणी आजूबाजूला हिरवगार निसर्ग. हे सर्व निहाळत आम्ही रामदऱ्या च सिद्धराम मळ्या पर्यंत पोहोचलो. इथेपर्यंत सर्व 22 जण एकत्र होते. चढ उतार असे करत जात असल्यामुळे 2 ग्रुप मध्ये विभागणी झाली. 14 जण चा एक ग्रुप पुढे गेला तर 8 जण मागे राहिले. मागच्या ग्रुप मधील 3 महिला थोड्या slow असल्यामुळे खूप अंतर पडले. आम्ही मल्हारगड ला पोहचलो सर्वांनी एकत्र नाष्टा केला आणी पुन्हा लाकडी दरवाजातून खाली उतरून पुढे धवळगड च्या दिशेने चलायला सुरुवात केली. दोन ग्रुप मध्ये खूप अंतर पडत गेले. टार्गेट समोर दिसत होते मात्र वाट खूप मोठी वाटतं होती.
पुढे गुरोळी गावा मध्ये एक मंदिरमध्ये मदत भेटली आणी 8 पैकी 5 जण गाडी ने पुढे गेल्या. मग आम्ही मागे असलेले तिघे फटाफट चालायला सुरुवात केली. समोर धवळगड दिसत मात्र पाय खूप थकले होते. तरी धवळगड सर केला. पुढे गेलेली टीम जेवणासाठी वाट बघत होती.
ट्रेकचा मूळ प्लॅन दिवेघाट ते भुलेश्वर असा होता, मात्र वेळ खूप झाला होता, शरीर थकलं होतं, पुढे जायची काहींची तयारी होती,मात्र अंधार पडला तर backup नाही ह्या विचारांती ट्रेक धवळगड लाच ट्रेक संपावला आणी आम्ही सासवड, दिवेघाट हडपसर असा करत परतीचा प्रवास करत पुणे गाठले.
रेंज पूर्ण झाली असती मात्र सकाळी निघायला झालेला उशीर आणी दोन ग्रुप मध्ये पडलेल अंतर ह्या मुळे summit शक्य झालं नाही.मात्र निर्णय झालं की आता पुढचा प्लॅन भुलेश्वर – धवळगड – भुलेश्वर ट्रेक करायचा.
बाकी खूप काही शिकायला मिळाल, नेहमी आज पर्यंत एक टार्गेट आणी त्यानंतर फ्रुट सलाड विथ आईस्क्रीम म्हणजेच अजून काही एक्सट्रा करण्याची सवय होती, मात्र ह्या वेळेला सर्वांसाठी सुरक्षित आणी समयसूचकता म्हणून निर्णय घेतला, तो फलदायी ठरला 🙏🙏
write up by
saket mithari
pune

Leave a Reply