पन्हाळा पावनखिंड ट्रेक
दिनांक 24 व 25 ऑगस्ट 2024
आम्ही 7 जणांनी मिळून ही ऐतिहासिक वाट अनुभवण्याचा प्रयत्न केला.
पन्हाळा वरुन सकाळी नाष्टा उरकून सकाळी वीर बाजी प्रभू व वीर शिवा काशीद स्मारकाचे दर्शन घेऊन सुरुवात केली. पन्हाळा किल्ला उतरून पुढे गेल्यावर एका वस्ती रस्त्याने पुढे जाऊन मसाई पठार च्या बाजूने चढण्यास सुरुवात केली. चढ थोडा असला तरी बऱ्यापैकी अंगावर आहे, त्यात धोधो पाऊस त्यामुळे दमछाक झाली नाही, मात्र काही मेंबर साठी थांबव लागतं होत. पुढे गेल्यावर पावसामुळे तयार झालेला धबधबा बघितला आणी मन तृप्त झालं. एक छोटीशी गाव वस्ती पार करून आम्ही मसाई पठरावर पोहचलो, हिरवगार बाहरलेला निसर्ग पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. नजर संपेल तिथं पर्यंत हिरवा गालिचा आणी ढगाची इकडून तिकडे पळापळ. कधी सर्व एकत्र येऊन बरसायचे कळायचंच नाही. मसाई पठरावर एक छोटे मसाईदेवीचे मंदिर आहे. मंदिराचे मागून उजव्या बाजूला गेला कि एक तळे आहे आणी खूप अंतर पाठराच आहे. पाठराचा शेवटी एक प्राचीन मसाई देवी चेक मंदिर आहे. दर्शन घेऊन पुढे गेलं कि उतार आहे आणि थोडा जंगल पार केल की खाली कुंभारवाडी गाव लागते. तिथल्या शाळे मध्ये आमची जेवणाची व्यवस्था होती मात्र आम्ही ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर पोहचल्याने आम्ही त्याचा पुढच्या गावात म्हणजे खोतवाडी गावामध्ये एक मंदिरात जेवण केले आणी पुढे मार्गस्थ झालो.
कुंभारवाडी चा धनगरवस्ती मधुन पन्हाळा पावनखिंड चा मार्ग आहे. पण बऱ्याच अंशी डांबरी रस्ता झालेला असल्याने जुनी पायावट स्थानिक शेतकऱ्यांनी शेतातली वाट मोडली आहे, पण सुदैवाने वन खात्याने रस्ता अडवल्याने काही अंतर डांबरी रस्ता तर काही अंतर पायावट आहे. छोटी छोटी गावं पार करत आम्ही करपेवाडी या आमच्या मुक्कामाचा ठिकाणी पोहोचलो. यांचा घरी आमची राहण्याची व जेवणाची सोय होती. छोटसं पण टूमदार – हिरवगार गावं अस गाव. बघायला फार छान होतं पण 24 km अंतर पार करून आम्ही गावात 3.15 ला पोहचलो होतो, डोक्यावर पाऊस होताच त्यामुळे करपेवाडी पोहचल्यानंतर घराचा बाहेर पडायची काही इच्छा होत नव्हती. रात्री तांदळाची भाकरी, झुणका, दही, ठेचा वर ताव मारून आम्ही झोपी गेलो.
पहाटे 5.30 ला उठून आवारावरी करून नाष्टा करून बाहेर पडे पर्यंत 7.30 झाले. करपेवाडी गाव छान मात्र टॉयलेट ची व्यवस्था थोडी अडचणीची आता मात्र एक मोठ government rest house होणार आहे. भविष्यात चांगली सोय होईल असा अपेक्षित आहे.
आज आम्ही 7 पैकी सहा उरलो होतो, एक जण दमून करपेवाडी मध्ये च गाडीत बसला. करपेवाडी मधुन पुढे जंगलातून वाट आहे. अजून पुढे गेलं की पाऊस खूप असल्यामुळे सर्व ओढे भरभरून वाहत होते रस्त्या मध्ये छोट्या वाड्या वस्त्या पार करत आम्ही माळवाडी ला पोहोचलो. पुढे थोडा डांबरी रस्ता आहे.साधारण 1 km अंतर पार केल्यानंतर उजवीकडे जंगलकडे वाट वळते. बराच वेळ जंगलातून आपली पायपीट होते मात्र पाऊस, हिरवगार निसर्ग आणी मनमुराद चालणारे साथीदार त्यामुळे आम्ही कधी म्हाळसवडे गावात पोहोचले कळले नाही, पुढे थोडे पुढे जाऊन जंगल वाटेला लागलो आणी पांढरपणी गावी पोहोचलो. आजच्या दिवशी चालणाऱ्या 6 जणांमध्ये पण दोन गट पडले आम्ही तीन जण पुढे होतो तर बाकी तिघे मागे होते. पांढरपणी येथे आमची गाडी आली होती मात्र गाडीत न बसता प्रभाकर पाटिल काका यांचा नेतृत्वात आम्ही तिघांनी पावनखिंडीकडे प्रस्थान केले. वाटेत गावामध्ये शिवकालीन एक विहीर आहे. पुढे डांबरी रस्त्याने चं जावं लागत. मागील वर्षी पांढरपणीला ट्रेक थांबावला होता यावेळेस मात्र पावनखिंड गाठायचीच असा चंग बांधला होता आणी तो पूर्ण केला. पांढरपणी ते पावनखिंड असा पाऊस होता की ह्या कोल्हापूर ला पावसाचं आगार का म्हणतात हे जाणवलं. पावनखिंडीत स्मारकाजवळ नतमस्तक झालो आणी ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंद झाला. खाली उतरून धबधब्यात भिजलो आणी सर्व क्षीण निघुन गेला.
सर्वांनी चेंज करून करपेवाडी वरुन आणलेलं जेवण घेतलं आणी पुण्याकडे प्रस्थान केले. वाटेत कराड जवळ तळबीड येथे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा स्मारकचे दर्शन घेतले आणी रात्री 9.00 ला घरी पुणे येथे पोहचलो.
ट्रेक छान झाला, दुसऱ्यांदा केल्यामुळे वाट माहित होती, पण सर्व route मार्क केला असल्यामुळे नवखा माणूस पण चुकण्याची शक्यता फार कमी आहे.
आता मात्र पुढच्या वर्षी पावनखिंड च्या पुढचा टप्पा म्हणजे पावनखिंड ते विशाल गड असा ट्रेक करायचा ठरवलं आहे बाकी श्रींची इच्छा