रविवार म्हणलं की ट्रेकिंगचा दिवस आला, या रविवारी आम्ही वेल्हा जवळील रायलिंग पठार व बोराट्याची नाळ चा ट्रेक करण्याचे ठरविले, या ट्रेक चे पूर्ण आयोजन आमचे मित्र अविनाश बांदल यांनी केले होते.
त्यासाठी आम्ही पहाटे साडेचारला पुण्याहून निघालो पाबेभाट मार्गे, वेल्हा जवळील एकलगाव या ठिकाणी पोचलो, रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्हाला जवळजवळ आठ किलोमीटर अलीकडे गाडी लावून चालत जावे लागले मोहरी गावापर्यंत. आठ किलोमीटर चालल्यामुळे आम्हाला खूप भूक लागली होती व त्यामुळे आम्ही आणलेली न्याहारी तिथेच करून, आम्ही पुढे जायचे ठरवले. प्रथम बोराट्याची नाळ करायची होती, त्यासाठी आम्ही नाळ्यातून पाण्यातून खाली उतरलो, वाहत्या पाण्यातून खाली उतरण्याचा अनुभव थरारक होता, खाली काही अंतर गेल्यानंतर उजव्या बाजूला लिंगाणा किल्ल्याच्या दिशेने आम्ही वळालो, तिथून लिंगाणा किल्ल्याचे अंतर 300 ते 400 मीटर असावे,अंतर कमी असले तरी धोकादायक आहे, काही संस्थांनी तिथे रोपचा आधार घेऊन जाण्याची सोय केलेली आहे. लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन आणि पोचलो, लिंगाण्यावर जाता आले नाही कारण तिथे टेक्निकल सपोर्ट फार आवश्यक असतो जाण्याकरता वरती. काही काळ फोटोग्राफी करून आम्ही रायलिंग पठार पाहण्यासाठी निघालो, नाळेतून वरती येण्यास सुरू केली.
दगडांच्या साहाय्याने वरती येण्याचा अनुभव थरारक अंगावर शहारे आणणारा होता, वरून येणारे पाणी व त्यातआपण दगडावर पाय ठेवतो ,तो दगड मजबूत असणं फार आवश्यक. असे करत आम्ही वरती पोहोचलो.
वर जाऊन काही काळ रायलिंग पठारावर आराम केला, तिथून दिसणारे मनमोहक लिंगाण्याची दृश्य, अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे होते, सगळं करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो, पुन्हा पावसात आठ किलोमीटर चालत जाऊन गाडीपाशी पोहोचायचे होते,
खूप मजा आली हे खूप थरारक अनुभव मिळाला. मढे घाट येथे आंघोळ करून आम्ही, वेल्हा येथे सायंकाळी पावणे सात वाजता जेवणासाठी पोचलो.
खूप सुंदर ट्रेकच्या आयोजन अविनाश बांदल भाऊ Avinash Bandal यांनी केले होते त्याबद्दल त्यांचे आभार