दर आठवड्याप्रमाणे रविवार म्हणलं की एक नवा ट्रेक एका नव्या किल्ल्याचा ध्यास , आज आम्ही कुबेर काका(62) naresh kuber , कुलकर्णी काका(66) Shashikant Govind Kulkarni , काकू(60) व खेडेकर साहेब(57) Bharat Khedekar यांच्यासोबत शिंदोळा गड सर केला.
पहाटे चारला आम्ही प्रवास चालू करून, साडे सातच्या दरम्यान ट्रेकला सुरुवात केली. साधारण तीन तास आम्हाला वर पोहोचायला लागले गड तसा खूप उंच आहे पण त्याची वाट गोल गोल फिरून असल्याने अंतर खूप वाढते. काही ठिकाणी अत्यंत अवघड असे चढ आहेत , तरी बाण दाखवले असल्याने चढायला फार मदत होते, या किल्ल्याची बांधणी टेहळणी किल्ला म्हणून केलेली आहे. त्यामुळेच या ठिकाणी फारशा ऐतिहासिक खुणा आढळत नाहीत. वर एक दगडामध्ये कोरलेले गणपतीचे शिल्प आहे, तसेच चार पाण्याच्या टाक्या आहेत, पाणी अस्वच्छ असल्याने पिण्यायोग्य अजिबात नाही , लहान लहान गुहा देखील आहेत. मात्र सर्वात वरच्या टापू वरून दिसणारे दृश्य पिंपळ जोगा धरण, निमगिरी किल्ला, हनुमंत गड यांचे दृश्य मनमोहक आहे , धरणाच्या पाण्याचा विस्तार पाहून कोयना जलाशयाचा भास होतो.
किल्ल्यावर जास्त काही पाहायला नसल्याने आम्ही जेवण करून खाली उतरायला सुरुवात केली, खाली येताना थोडा रस्ता चुकला पण थोड्यावेळाने आम्ही पुन्हा पूर्व रस्त्यावरती आलो. अशा तऱ्हेने आमचा हा सुद्धा ट्रेक छान झाला. टी टी एम एम स्वरूपात असल्याने कमी खर्चामध्ये झाला.
साकेत मिठारी