दिनांक 12 मे 2024 रविवार
सोनगिरी व ड्युक्स नोज(नागफणी) ट्रेक
आम्ही पाच जणांनी मिळून, ठरल्याप्रमाणे वरील ट्रेक केला. या साठी आम्ही रविवारी पहाटे 4.00 ला सिंहगड रोड येथून प्रवास सुरु केला आणि लोणावळा, खोपोली मार्गे पळसदरी या गावी 6.15 ला पोहचलो. गावातूनच कालकाई मंदिरा पर्यंत रस्ता आहे. तिथूनचं ट्रेक सुरु होतो. रेलवे रुळावरून चालत जाव लागत, काही अंतर पार केल्यावर एक बोगदा लागतो, बोगद्याच्या डाव्या बाजूने सोनगिरी किल्ल्यावर कडे जाण्यास पायावट आहे. साधारण दोन तासाचा चढाई नंतर आपण किल्ल्यावर पोहचतो. किल्ला पूर्णपणे चढणीचा आणि खाली येताना पूर्णपणे उतरणीचा आहे.चढताना पूर्ण घाम निघाला कोकणतील उकाडा आणि त्यात सकाळची अद्रता त्यामुळे हा ट्रेक कायम लक्षात राहील. किल्ला ठेहळणीसाठी असावा, एक टाके, मोडकळीस आलेला बुरुज वा एक पाण्याचे टाके सोडले तर फार काही शिल्लक अवशेष नाही. सध्या उभरण्यात आलेला ध्वज आणि दुसऱ्या बाजूला शिवमुद्रा लावण्यात आली आहे. ह्या सर्व गोष्टी पाहून आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली. जवळ असलेली शिदोरी खाऊन खाली गाडी पर्यंत पोहोचलो.
पुढे लोणावळा जवळील dukes nose म्हणजेच नागफाणी ला जाण्याचा प्लॅन होता, मात्र खोपोली जवळील लेण्या पहायच्या आणि पुढे जायचा ठरलं, ज्या लेणी गेलो ती गगन गिरी महाराजांचा माथातून जाऊन पाहावी लागते असा कळलं, मात्र रविवार असल्याने फार गर्दी होती, गर्दी चा अंदाज घेऊन आम्ही टाळलं वा लोणावळा च्या दिशेने निघालो.
साधारण 1.30 च्या सुमारास लोणावळा जवळील कुरवंडे गावी पोहचलो वा ट्रेक ला सुरुवात केली. पॅच पैकी चार जणांनी हार्दिक ट्रेक पूर्वी केला असल्यामुळे त्या बद्दलची उत्सुकता थोडी कमी होती, मात्र उन्हाने आमची पक्की जिरवली. इथे मात्र सकाळी अनुभवलेली कोकोणतील अद्रता अजिबात नव्हती. वर गेल्यावर अनेक किल्ले दूरवर पाहायला मिळाले. एक्सप्रेस हायवे, नवीन सुरु असलेले missing link चे काम सर्व काही दृष्टीस पडले. dutch nose वर जाऊन फोटो काढले आणि खाली उतरताना रणमेवा खात – करवंदा खात ट्रेक पूर्ण केला.
परतीचा प्रवासाला केली, थोडा वेळ लोणावळा तिला ट्रॅफिक जाम मध्ये गेला, पुढे कामशेत अलीकडे एक धाब्यावर शाकाहारी जेवणावर ताव मारून, पुण्याच्या दिशेने निघालो.
अशा रीतीने बरेच दिवस मनात असलेला सोनगिरी चा ट्रेक ची इच्छा पूर्ण झाली.
लेखन –
साकेत मिठारी