हरिश्चंद्रगड ट्रेक – पाचनई

दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार मी सर्व मित्रांनी मिळून हरिश्चंद्रगड चा ट्रेक केला. हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकच्या दुनियातील एक ड्रीम ट्रेक, बऱ्याच दिवसांपासून माझाही पेंडिंग होता तो काल झाला.
त्यासाठी आम्ही पहाटे चार ला पुण्याहून निघालो नाशिक रोड ने नारायणगाव मार्गे ओझर ओतूर कोतुळ ब्राह्मणवाडा मार्गे आणि पाचनई गावापर्यंतचा प्रवास केला. सोबत आणलेली शिदोरी व गरम पोहे खाऊन ट्रेकची सुरुवात साधारण सकाळी साडेनऊ वाजता केली, साडेअकराच्या दरम्यान आम्ही हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरापर्यंत पोचलो. धुक्यामुळे जास्त काही दिसत नव्हते, पण पाऊस आणि धुके यांचा आलाप संगम पाहायला मिळाला.
किल्ल्यावर पाहायला हरिश्चंद्रेश्वर मंदिर, गणेश गुहा, केदारेश्वर लेणी हे सर्व पाहायला मिळाले . कोकणकड्यापर्यंत आम्ही गेलो, परंतु धुके असल्याने काहीही पाहायला मिळाले नाही. पाचनई मार्ग असलेली वाट तशी सोपी आहे, रॉक पॅच असला तरी सेफ्टी ग्रील लावलेले आहेत.
गडावरून दिसणारे दृश्य विलोभनीय आहे पाऊस असल्यामुळे छोटे-मोठे धबधबे भरपूर पाहायला मिळाले, व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता आला. केदारेश्वर लेणीमध्ये महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी तर आम्ही पाण्यातून पोहत गेलो. त्याने तर आनंद द्विगुणित केला.
अशा तऱ्हेने आमचा ट्रेक, पुढील ट्रेक परत एकदा हरिश्चंद्रगडावरती नोव्हेंबर मध्ये करायचा या संकल्पा सह , पूर्ण झाला. टी टी एम एम बेसिस वर असल्यामुळे अगदी 774 रुपयात, अत्यंत अत्यल्प खर्चात झाला.

Leave a Reply