दिनांक २०२४ एप्रिल ५, ६ आणी ७ (शु्क्रवार, शनिवार आणी रविवार)
प्रवास; दिवस ०ः पुणे ते खिरेश्वर.
साधारण २ आठवड्यापासून ठरलेला हा ट्रेक!
जसे की हरीशचंद्र गड कोकणकडा मुक्कामी जायचं. तसं आमच्या स्वखर्च भ्रमंती वाट्सअप कट्ट्यावर साकेत ह्यांनी ठरल्याप्रमाने भ्रमंतीचा एकुन कार्यक्रम जाहीर केला. आणी वेगळा ग्रुप बणवुन तशी लिंक प्रसारीत केली तेव्हा साधारण ३५ जन लिंकवरुन ग्रुपमध्ये सामील झाले खरं पण त्यातले ५ जनच राहीले.. बाकी गळपाटले!
असो.. भ्रमंती कडे वळू 😀
तर… पुर्वनियोजनाप्रमाने आम्ही सार्वजनिक लालपरी ने प्रवास करुन जायचे निश्चित केले. ठरल्याप्रमाने आम्ही संध्याकाळी ७ वाजता वाकडेवाडी येथील मध्यवर्ती बस्थानकावर पोहोचलो. गुढीपाडव्या निमित्त सर्व चाकरमानी आपल्या गावाकडे जाण्यासाठी स्थानकावर चंगळ करत होते. एक एसटी बस आली पण आम्हाला जागाच भेटली नाही. दुसरीची पण तिच बोंब, मग येईल त्या बसने आळेफाट्यापर्यंत जायचं आम्ही ठरलं. ७ वाजेपासुन आम्ही बसस्थानकावर गाडीच्या प्रतिक्षा करत ९ वाजले होते, आम्ही ६ जन एखाद्या बसकडे गेलो की सर्वच प्लॅटफार्म मागे धावत होता आणी ह्यात कसा वेळ गेला हे कळलं नाही वरुन मी बर्मुडा घातलेला त्यायोगे स्थानकावरील डासं यथेच्छ मेजवानी झोडत होते. डासांचे हे आक्रमन टाळण्यासाठी मी कॅरिबियन डांसर सारखा पाय हलवत होतो. अशीच परीस्थीती स्थानकावरील बाकी हाफ पॅंटवाल्यांची पण होती, माझं हे डासयुद्ध चाललच होतं इतक्यात एक बस आली आणी सगळी जमलेली चंगळी तिच्यावर तिच्याकडे धावत तुटुन पडली. जागा धरायला कोणी रुमाल, तर कोणी स्वतची ओढनी तर कुणी बॅग असं खिडकीतून आत शिटवर भिरकावीत होते. मी हे सर्व दुर ऊभे राहुन पाहत होतो कारण माझी हिम्मतच झाली नाही त्या गर्दीला चिरुन आत घुसण्याची किव्हा असे खिडकीवाले स्टंट करण्याची. असो इतक्यात साकेतचा आवाज आला आणी मी भानावर आलो. साकेतने ह्या गर्दीवर मात करुन सिट पकडली होती त्याचे मला खुप कौतुक वाटले. मी बसमध्ये चढलो मधल्या गल्लीत थांबलेल्या लोकांना सावरत मागे आलो अन सुटकेची श्वास घेऊन स्थानापन्न झालो. मागच्या सिटवर एका कार्यकर्त्याने लाईन मध्ये चार शिट पकडल्या होत्या आणी एक १३-१४ वर्षाच्या मुलाला तो दरडावत होता. तो त्या मुलावर ओरडत होता त्याला बोलत होता “तु उठ, नाहीतर माझ्याइतका वाईट कोणी नाही. मला नाशिक ला जायचंय, लाबचा पल्ला आहे, लयसोबत बाळ आहे! आई, बायको आणी लहान १ वर्षाचे मुलं घेऊन अश्या गर्दीत घुसलेला हा इसम मला गडघ्यात मेंदु असल्यासारखा भासला कारण थेट नाशिक साठी विनावाहक अश्या वातानुकुलीत बस असतांना हा ईथे गर्दीत खपत होता आणी गप्पा चंद्राच्या ठोकत होता. हा त्या मुलाला बोंबलतच होता तितक्यात त्याच्या मागच्या सिटवरील एका सदग्रहस्थाने मध्यस्ती करत ह्या गुडघ्यात मेंदुला थोडा झापला आणी त्या मुलाला स्वतच्या सिटवर जागा दिली” आम्ही आमचा बस्ता व्यवस्थीत ठेऊन निवांत झालोच होतो तितक्यात बसचे टीकीट मास्तर आले आणी अख्ख्या गाडी मध्ये फक्त ७ सिट सोडुन बाकी सर्व गाडी आरक्षीत असल्याचे कळविले.
वाहरे देवा.. घे बांबु!
पण मला आमच्या सिट जाण्याच्या दुःखापेक्षा त्या गुढग्यात मेंदु असलेल्या इसमाची सिट गेली ह्याचा जास्त आनंद होता त्याचा चेहरा खाजील झाला होता. त्याच्याकडेच उतरनारा प्रत्येक माणुस पाहत होता. 😀 अनं आमची हिपण बसं गेली. बसने प्रवास करतो ह्या खुशीत आम्ही फोटोशूटपण केले होते.
१० वाजले, इतक्यात प्रभाकर काका बोलले हे काय आपल्याला जमायचं नाही आपण स्वतच्या गाडीने जाऊं. आम्हाला ते पटलं. काकांनी एक फोन केला आणी १० मिनिटात काकी गाडी घेऊन तिकडे हजर झाल्या. बसमध्ये जानारे आम्ही थेट क्रुज मध्ये सर्वसुख विसावलो. १०ः३० ते १२ः३० पुणे-जुन्नर-खुब्बी फाटा- खिरेश्वर असा प्रवास करुन आम्ही आमच्या निश्चित ठीकाणी पोहचलो तसे सगळेच बाहेरील व्हरांड्यात मोठी मॅट टाकुन त्यावर पहुडलो. मस्त चांदने पसरले होते ते पहात झोपुन गेलो.
पदभ्रमंती; दिवस ०१ः
खिरेश्वर – तोलारखिंड – हरीषचंद्रेश्वर मंदीर – बालेकिल्ला – कोकणकडा सुर्यास्त दर्शन आणी कोकणकड्यावरच मुक्काम.
सकाळी ४ः३० वाचता उठून नैसर्गिक विधी आटोपून, तैयार झालो. गरमागरम पोह्यावर ताव मारुन डिकाशन घेतले आणी निघालो आमच्या गाडीकडे.. पोहचलो तसे… अनलॉक करुन डीकी उघडली, सर्वांनी बॅग्स ठेवल्या आणी डिक्की बंद केली. मी चला चला बसा बसा म्हणत होतो तेव्हा अचंबितपणे काका स्वतःचीच जिभ चावत बोलले अरेरेरे .. अनलॉक करुन अनावधानाने चावी बॅगमध्ये टाकली आणी बॅग डीक्कीत.. आणी गाडी लॉक. झालं.. नक्टिच्या लग्नाला १६ विघ्न.. सर्वदूर शांततेत आम्ही आजुनच जास्त शांत झालो. आणी सर्वांना प्रश्न पडला की आत्ता गाडी कशी अनलॉक करायची? अंगावरची कापडं सोडली तर सर्वच आम्ही डिक्कीत कोंबलं होतं.
मी Techie आहे त्यायोगे YouTube वर बघायला सुरवात केली की गाडी कशी अनलॉक करता येईल पण युटुबवरील भंपकगीरी काही कामी आली नाही. कोणी बोललं काट फोडावी लागेल कोणी बोललं दुसरी चावी आना. काकांनी घरी फोन केला काकींनी लगेच त्यांच्या कारच्या मेकॅनिकला लाईनवर घेतलं आणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं तस आम्ही अथक प्रयत्नांनी गाडी अनलॉक करण्यात यशस्वी आणी एकच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता. गाडी काढुन आम्ही टोलारखिंडीच्या मार्गाकडे कुच केली. तिथे पोहचतो तेच कळले की गाडीची काढलेली कव्हर पडलीय.. मग काय परत गाडी घेऊन ति शोधाशोध करुन परत आनली. आणी गारी खिडीच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंग वर व्यवस्थीत पार्क केली. साधारण दिड ते दोन तास वेळ दवडला गेला होता पण आमचा उत्साह जशास तसा होता. बॅग्स पाठीवर ओढत आम्ही तोलारखिंडीकडे मार्गक्रमन केले. तसा पाठीमागुन एक मुलगा मलाही वर येऊद्या म्हणत आमच्यात सामील झाला. असे ७ जन आम्ही निघालो. ७ः४१ मीनिटांनी निघुन ८ः४१ पर्यंत आम्ही वायपॉईंट वर येऊ पोहचलो तीच ही तोलारखिंड. डावीकडे वर जानारा रस्ता आपल्याला हरीशचंद्र गडावर घेऊन जातो आणी उजवीकडे खाली जानारा रस्ता कोथाळे गावात घेऊन जातो. खिंडीत कोरीव महादेवाची पिंड आणी वाघाचे कोरीव चित्र पहायला मिळतें. दर्शन घेऊन आम्ही क्षणभर तिथे विसावलो अन जलप्राशण करुन पुढे निघालो. पुढे एक कातळ मार्ग चढुन ९ः५० ला आम्ही बालेकील्ल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीपाशी आलो. आत्ता उन्हाच्या झळा लागत होत्या. म्हणुन तिथे लिंबु सरबत घेण्याचा मोह आम्हाला आवरतां आला नाही. लिंबुपाणी घेतले आणी मार्गस्थ झालो आणी ११ः४० ला आम्ही हरीशचंद्रेश्वयराच्या मंदीराजवळ असलेल्या पालावर पोहचलो जिथे आमची जेवनाची व्यवस्था होती. आम्ही तिथे बॅग ठेवल्या आणी थेट मंदीराकडे जाऊन बाहेर असलेल्या टाक्यातलं थंडगार कातळपाणी बादलिच्या साहायाने काढुन छानं अंघोळ केली. आणी महादेवाचे दर्शन केले. तसे हाऊशीरामानी जेवनासाठी हाक दिली. आम्ही परतलो आणी यथेच्छ बटाटा भाजी भाकरीवर ताव मारला. आणी व्हरांड्यातल्या सावलीत स्वतला फेकून दिले.
थोड्या गप्पा रंगतात मला कळले की माझी थोडी गोची झाली आहे कारण तारामती शिखर म्हणजेच हरीषचंद्राचा बालेकील्ला अश्या गोड गैरसमजात मी आजतायगत जगत होतो. पण तो हाऊशीरामांनी साफ खोडतां केला. सकाळी जिथे आम्ही सरबत घेतले तिथेच परत एक वायपॉईंट होता जे वर डाव्या हाताला बालेकिल्याकडे जात होता पण आम्ही उजव्याहीताने मंदीराकडे आलो होतो. मग काय थोडा आराम करुन आपण बालेकील्ला पाहायचाच असे काकांनी सुचवले. आम्ही थोडा आराम करुन ३ वाजता परत २ किलोमीटर मागे आलो आणी बालेकिल्ल्याच्या निसरड्या मातीवर घसरत घुसरत चढायला सुरवात केली. चढाई कठीन होती म्हणुन आमच्यातल्या दोघांनी वर न येण्याचा पवित्रा घेतला. तसे आम्ही त्यांना तिथे थांबावयास सांगुन पुढे मार्गक्रमन केले. जसे आम्ही बालेकिल्ल्यावर पोहचलो तसे डोळ्याचे पारने फिटले😍 वर महारांजाची सुंदर अशी मुर्ति स्थापणा केलेली आहे त्यांच्या मागे अख्खा पिंपळगाव जोगा धरण, बाजुला तटस्थ सिंदोळा दुर्ग, माळशेज घाट आणी त्यामागे दिसनारा नानेघाटाचा परीसर हडसर, हनुमंतगड, निमगीरी, जिवधन आणी वानरलिंगी सुळका सहज नजरेस पडतो. आणी समोर भैरवगड, कळसुबाई, कात्राबाई, रतनगड आणी एएमके चा परीसर दिसतो. २ वेळा हरीषचंद्रावर आलेलो मी प्रथमचं आज बालेकिल्ल्यावर आलो होतो. वरुन विहंगम सह्याद्री पाहुन मन हर्षाने भरुन आले होतं. हे सर्व काही कॅमेरात टिपत आणी डोळ्यात साठवत आम्ही खाली उतरायला सुरवात केली आणी अवघ्या अर्ध्या तासात हाऊशीरामांचे पाल गाठले आणी तिथुन तंबु घेऊन कोकणकड्याकडे मार्गस्थ झालो. सर्यास्त व्हायच्या अगोदर आम्हाला कोकणकडा गाठायचा होता म्हणुन झपाझप पावले उचलत आम्ही चाललो होतो. आणी ५ः१५ च्या दरम्यान आम्ही कड्यावर पोहचलो. तिथे बसुन मस्त मावळतीचा शांत सुर्य पाहत दिवसभराच्या तंगडतोडीचे चिझं झाल्याचा आविर्भाव आनत आम्ही सुर्यास्ताचा आनंद घेतला आणी आमचे तंबु उभारले. रात्री जास्त जेवन नको म्हणुन साधा दाळभात आनायला सांगीतले होते. थोडा थोडा तो खाल्ला, शेकोटी पेटवून गप्पा झाल्या आणी आमच्या तंबुत पहुडलो. मी शांतचित्त झोपनारा असल्याने कडकडीत घारघुर घोरने आणी अत्यल्प हवेशीर पणा न्हवता म्हणुन थेट तंबुच्या बाहेर मॅट टाकुन आकाशात दिसनारी म्हातारीची बाज म्हणजे सप्ततारे पहात झोपुन गेलो.
पदभ्रमंती; दिवस ०२ः
कोकणकडा – तारामती शिखरावरुन सुर्योदय – हरीषचंद्रेश्वर मंदीर, केदारेश्वर – कोकणकडा – नळीच्या वाटेने बेलपाडा.
कुस बदलत कधी उठायची वेळ झाली ते कळलंच नाही. ४ वाजता आयफोन चा पॉंमपॉंम~~~~ असा अलार्म झाला आणी मला जाग आली तसा लागलीच सर्वांना उठायचा कॉल दिला. सर्वजन पटापट उठले आणी नैसर्गिक विधी आटोपून ४ वाजुन ३५ मिनिटांपर्यंत तैयार झाले. सोबत पाणी आणी टॉर्च हे घेऊन बाक़ी सर्व आम्ही टेंट मध्येच ठेवलं आणी कोकण कड्याच्या डाव्या बाजुने तारामती शिखराकडे वाटचाल चालु केली. हा रस्ता नेहमी बदलतो. ह्यावेळी मळलेला होता पण अंधारामुळे कळत न्हवता म्हणुन मला जेव्हा कधी चुकल्याची शंका वाटायची तेव्हा मला साकेत आणी त्यांच्या जिपीएक्स ची मदत मीळायची. आम्ही तारामतीच्या पोटाने चालत घळीच्या रस्त्याजवळ आलो अन मला नेमके ह्याच रस्त्याने जायचं होत म्हणुन काळजीपूर्वक लक्ष ठेऊन होतो कारण ह्याचा पुढुन निघनार मार्ग कमी चढाईचा असला तरी दाट काटेरी होता. आम्ही घळीतून वर आलो आणी काही अंतर चालून आम्ही पहील्या टप्याच्या शिडीजवळ आलो. हवेत गारवा असल्यामुळे थकवा जानवतं न्हवता तरी छोटे ब्रेक घेउन आम्ही जलप्राशन करुनच पुढे मार्गस्थ होत होतो. बघता बघता आम्ही दुसरा टप्पा पार केला आणी वर सपाटीवर आलो. पुढे एक छोटा टप्पा पार केला की आपण दोन्ही बाजुने निमळत्या अश्या भागावर येतो. हवा असेल तर ईथुन सावकाश चाललेलेच बरे.. आत्ता आपण पोहचतो शेवटी तारामती शिखराच्या सर्वोच्च ठीकाणी जिथे सर्वप्रथम आपल्या नजरेत पडतो तो भगवा झेंडा आणी तिथेच कातळ कोरीव महादेवाची पिंड. साधारण सकाळच्या ५ वाजुन ४५ ला आम्ही वर पोहोचलो होतो. असा शांत परिसर आणी सकाळचा कडकडीत गारवा इथे प्रकर्षांने जानवतं होता. खाली असलेला पींपळगाव जोगा धरन गावच्या लाईट्स चे प्रतिबिंब चमकावीत होता. हा अनुभव कुठेही नाही. सुर्योदय ६ वाजुन १९ मिनिटांनी होनार होता आणी आम्ही खुप अगोदर पोहचलो होतो आमच्याशिवाय तिथे कुणीही न्हवत. तितक्यात कोकणकड्यावरुन सतिष डिकाशन घेऊन आला. ह्या वातावरणात नाही प्यायलो तर देव पाप देईल ह्या मताने सर्वांनीच त्याची बोहनी केली आणी मस्त डिकाशन प्यायलो. उजव्या बाजुला माळशेज घाटावरून जाणाऱ्या वाहनांच्या लाईट आम्हाला माळशेज घाटाचं रेखाचित्र पुसट दाखवत होत्या. पुर्वेला चांगल तांबड फुटल होतं. तांबडात थोडं प्रकाशल्या सारखं झालं. तसा तारामती शिखराला लागुनच असलेला समउंचीचा हरीषचंद्राचा बालेकिल्ला आणी थोडा मागे सिंदोळा झोपेतुन उठून डोके वर करुन जांभई देतोय की काय असा भासत होता. कोकणकड्याची बाजु आणी मंदीर आत्ता स्पष्ट दिसत होते. ६ वाजुन १५ झाले होते. अवघ्या ४ मिनिटात सुर्य नारायन येतील आणी आपलं मोहक रुप दाखवुन आजचा दिवस मार्गी लावतील अशी मनी अशा ठेवन डोळ्यात तेल घालुन बसल्यासारखे सर्व पुर्व बाजु न्याहाळत होते कारण तांबड वाढल होतं आणी नक्की भास्करराव कुठुन वर येतील हे आमच्यापैकी कुणालाही माहीत न्हवतं. प्रतिक्षा संपली, सार्थक झाल सुर्योदय झाला.. हर्षोल्हासाने सर्वजन भारावून गेले सर्व प्रदेश सुर्याच्या किरनांनी न्हाऊन निघाला. कोणी बोटावर, तर कुणी हातावर तर कुणी डोक्यावर सुर्य घेतल्याचा अविर्भाव आनत तसे स्वतचे फोटो कॅमेरात टिपत होते. मी मात्र त्या सर्वांना निरखत होतो सोबतच टाईमलॅप्सने नारायला साठवीत होतो. पुर्णपणे मी ह्या क्षणांमध्ये खोलवर रुजलो होतो इतक्यात कुणीतरी मला आवाज देतय असं जानवलं पाहीलं तर साकेत खाली उतरायचा कॉल देत होते. कोकणकड्यावरुन चढलेलो आम्ही हरीषचंद्रेश्वराच्या मंदीराच्या बाजुला उतारायला सुरवात केली. पण इथे आम्ही पायवाट सोडुन बरोबर मंदीराच्या दिशेने चाललेल्या घळीतूनच उतरायचा निर्णय घेतला. हा रस्ता भन्नाट होता. कुणीही असा पराक्रम करु नये कारण त्या घळीत हे भले मोठे दगड तेही वरुन गर्द झाडीमुळे ह्या दगडांचे शेवाळ अजुन घट्ट हिरवे होते. त्यावर मधमाश्या मिनमिनत होत्या. कदाचीतच ह्या रस्त्याने कोणी गेलेलं असेल. आमच्यात नागेश होता तो तर एका ठीकाणी चक्क मधमाशांचे पोळ उठले असे समज़ुन मागे पळाला. पण अशी आताताई करु नये. त्या माश्या चावण्याच्या दिमाखात न्हवत्या. त्या शेवाळावर काहीतरी टीपत होत्या. अश्या ह्या वाटेने आम्ही लवकरच खाली आलो नि थेट पोटात असलेल्या लोण्यांजवळ येऊन पोहोचलो. ह्या सातही लेण्या
फिरुन सर्वांना दाखविल्या तर इथेडी मधमाश्यांनी आपलं ठानं मांडल होतं. इथे असलेल्या भव्य गणरायाचे दर्शण घेऊन आम्ही खाली हरिषचंद्रेश्वराचे दर्शन घेतले, तिथे कातळातले थंडगार पाणी भरले आणी मंदीराच्या डाव्या बाजुला असलेल्या केदारेश्वराच्या गुफेकडे आम्ही उतरलो. तिथे १२ महीने थंड पाणी असत आणी गुफेत महादेवाची भव्य साळुंखी आहे. ह्याच पाण्यात लोकं उतरतात आणी तेच पानी पिंडीवर फेंकतात हे कितपत योग्य आहे? मला ते कधीच पटलं नाही. मी ३ वेळा ह्या ठीकाणी गेलोय पण असा अभद्र प्रकार करावा असं मला कधी वाटल नाही. कारण हे पाणी वाहते नाही आणी आपले पाय काय स्वच्छ असतात काय? समजा मला भविष्यात पिंडीच्या जवळ जाऊन दर्शण घ्यावास वाटले तरी मी पाणी टाकणार नाही! असो आम्ही दर्शण करुन परत वर आलो आणी तसेच हाऊशीरामांच्या झोपडीकडे वळुन त्यांच्या हिशोब केला. नंतर कड्यावर अंकुशरावांला पोहे बणवायला सांगीतल होते आणी त्यांनीही अपेक्षेप्रमाने चमचमीत पोहे बणवले. पोह्यांवर आम्ही यथेच्छ ताव मारला आणी मनोज ला पाचारण करत आम्ही ९ वाजुन ३० मिनिटांनी कोकणकड्याच्या उजव्या बाजुने नळीच्या वाटेकडे प्रयान केले. आत्ता सुरु झाला होता ह्या मोहीमेतला सर्वात खडतर प्रवास थोडं खाली उतरलो की तुम्हाला पहीली निसरडी कातळ लागते आणी समोर भलामोठा सितेचा डोंगर दिसतो आणी मध्ये खोलच खोल अशी दरी! इथे खरतर रोपची गरज आहे पण काही प्रयोजन नसल्यामुळे वेळेअभावी लावता आला नाही म्हणुन सर्वांना अगदी काळजीपूर्वक आम्ही खाली घेतले. इथे खाली उतरलो की आपला आवाज सितेच्या डोंगराला धडकुन परत आपल्याला एैकु येतो. आम्हाला इथे धोषनाबाजी करण्याचा मोह आवरला नाही! छत्रपती शिवाजी महाराज कि~~~ जय! धर्मविर छत्रपती संभाजी महाज कि ~~~ जय! मला पुर्व कल्पना होती की नळिची वाट हि माणसाची वाट लावते. खाली गावीत उतरायला ५ तास लागतात. ओबड धोबड ओंगळवाणे मोठमोठे दगड फक्त आपल्याला ह्या मार्गात दिसतात. थोडं चाललो की आम्ही येतो पहील्या रॅपलिंग पॅच जवळ जेथुन आपल्याला रोप चा साह्याने उतरावं लागतं. एक एक जन हा थ्रिल अनुभवत खाली उतरत होते. सर्वजन उतरुन रोप ओढून घेतला आणी पुढे तासाभरात दुसरा पॅच आला तिथेही आम्ही व्यवस्थीत उतरलो. परत सुरु झाला तो ओंगळवाणा रस्ता… आत्ता आमच्यात असनारे २ कार्यकर्ते थकले होते, २ मिनिटे चालून १० मिनिटे थांबायचा पवित्रा त्यांनी घेतला. बोलुन सवरुन सर्व हतकंडे वापरुन झाले पण त्या दोघांची गती काही वाढेना. मग तितक्यात साकेत नी मला दिलासा देत बोलले तुम्ही व्हा पुढे मी आनतो ह्यांना, तसा मी थोड्याश्या निवांत मनाने पुढे सरकलो पण मागुन हे दिसत नसल्याने थांबलो आणी आवाज दिला, तेव्हा प्रतिसाद मिळाला, येतोय आम्ही तिथेच थांबा!
मी थांबलो, साधारण २५ मिनिटांनी हे लोकं आले. तेव्हा दोघांपैकी आमच्यातील एक पार गळपाटला होता. त्याला पाणी, बादाम आणी चॉकलेट देऊन चालते केले. साकेत अन मी थोड़े पुढं चालत होतो. तेव्हा साकेतचा आणी माझा झालेला संवादः
साकेत- प्रविण, तो वर झोपला होता. तेव्हा मी फक्त त्याच्या छातीकडे पहात होतो कि धडकतीय का नाही!
मी- खरं! तुम्ही त्याला झोपु द्यायला न्हवत पाहीजे कारण शरीर एकदा निवांत झाले कि परत उठून वार्मअप व्हायला वेळ जातो आणी त्यातच आपण थकतो.
साकेत- आत्ता तुच ह्यांना घेऊन ये, मी पुढे सपाटीचा रस्ता कुठपर्यत आहे तेवढं बघतो.
मी- ठीक आहे, तुम्ही समोर जा मी येतो घेऊन दोघांना.
साकेत पुढे गेले, हे दोघे २ मिनिटे चालून १० मिनिटे बसत होते. मी थोडा वैतागलो होतो ह्यांना पण अश्या भरपुर मोहीमा केलेल्या आणी शेवटच्या माणसाला घेऊनच खाली उतरण्याचा सहनशील अनुभवाच्या जोरावर त्यांना मी गप्पांमध्ये रंगवत कासव गतीने का होईना पुढे ढकलत होतो. त्यांच्या इतक्या थांबाव्याने आमच्याजवळच सर्वच पाणी संपल. आत्ता काही खर न्हवत कारण पाण्याशिवाय ही खडतर वाट आणी वरुन पडनारे उन झेपनार न्हवते. तितक्यात मनोज बोलला पुढे पाणी आहे. मी तिथपर्यंत ह्या दोघांना घुमवित घेऊन गेलो, पाणी दिसले, जिवात जिव आला, ह्या दोघांना सावलीला बसवले. साधारण अर्धा फुट खोल आणी एक फुट रुंद असा पाण्याचा झिरपा होता त्यातूनच बाटलीच्या झाकनाच्या साह्याने २ बाटली भरुन घेतल्या! भरपुर वेळ वय झाला ३ वाजले होते. अजुन १५ मिनिटांचा रस्ता १ तास घालवनार होता. त्या दोघांना पाणी पाजले, एकाच्या तोंडात अख्खा लिंबु फोडला. तेव्हा तो उठला आणी थोडे चालून परत थांबला अन भरलेले सर्वच पाणी प्यायला अन वरतुन बोलला आत्ता शक्य नाही चालने माझ्याकडून होनार नाही म्हणतं अलटा दगडावर झोपला. मला फार अवघड वाटले कारण ह्या दगडधोंड्याच्या मार्गांवर त्याला उचलुन घेनेही अशक्य होते. तेव्हा मी बोललो कि तु नुसता पाय टेकव बाकी मी तुझा पुर्ण पुर्ण भार घेतो आणी तुला सावरतो. असाच पुढचा एक किलोमीटर मी त्याला घेऊन चाललो, अगदी दारु पिऊन माणुस चालावा तसा आमचा कार्यकर्ता चालत होता. बोलण्यातही काही तारतम्य उरले न्हवते असच चालत आम्ही एका ओढ्यातून उतरतत होतो, आमचे ३ गडी म्हणजे पाटील काका, कामठे सर आणी नागेश पुढे गेले होते. नागेश आमच्यासाठी परत पाणी घेऊन आला त्याचं मला खुप कौतुक वाटलं, मग मस्त पाणी प्यायलो आणी काही मिनिटांत एका शेतात येऊन पोहोचलो जिथे सर्वजन आमची देवासारखी वाट पाहत होतें. झालं आम्ही जिंकल होतं आत्ता ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर गाव होतं. प्यायला मुबलक पाणी भेटलं. तिथं दोण मिंनिट प्रष्ठभाग स्थिरावत मी मनापासून सुटकेचा श्वास घेतला. पण इथेच आमचा ट्रेक संपला न्हवता पुढे आम्ही मनोज खातर ह्याच्या घरी पोहोचलो तिथेच अंघोळ केली ति पण थंड पाण्याचा शॉवरने, होय शॉवर बोललो मी, मनोजने आपल्यासारख्या ट्रेकर, पर्यटकांसाठी पक्के घर बांधुन प्रशस्त व्यवस्था केली आहे.
फ्रेश झालो, भेळ खाल्ली तसा मनोज आला आणी एका मुलीने कोकणकड्यावरुन आत्महत्या केल्याचं आम्हाला सांगीतल.
आम्ही सगळे भांबावून गेलो अख्ख्या २ दिवसांच्या भटकंतीवर विरजन पडले होते. एकटी आलेली ही मुलगी पाचनईतुन भागवत भारमल (लोकल गाईड) ह्यांना घेऊन वर चढली होती. साडेदहा वाजता तिने हरीषचंद्रेश्वराचे दर्शण घेतले आणी १२ वाजुन ३० मिनिटांनी कोकणकड्यावर पोहचून उजव्या बाजुकडे कोणी नाही हे जाणुन सरळ खाली उड्या घेतली आणी जिवणयात्रा संपवली.
बेलपाड्यातुन एक पिकअप करुन आम्ही खिरेश्वर कडे प्रस्थान केलें नागेश मोरोशी मध्ये उतरला आणी तेथुन बस पकडणार होता पुढे आम्ही माळशेज घाट ओलांडला सर्वच शांत होते कारण त्या मुलीचे असे सुंदर ठीकाणी येऊन स्वतला संपवने मनाला चटकन लावनारे होतं. तासाभराने म्हणजे ७ वाजता आम्ही खिरेश्वर गावात पोहचलो. तिथुन आत्ता पुणे गाठायचे होते, साधारण १२ वाजुन ३० मिनिटांनी आम्ही सर्वजन पुण्यात पोहोचलो!
प्रविण ✍🏻
Ig|ektrekker